बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्याशी असलेले कथित अफेअर असो किंवा वैवाहिक जीवन रेखा कायम चर्चेत असतात. एकेकाळी तिच्याशी संबंधित बातम्या चित्रपट वर्तुळात चर्चेचा विषय असत. रेखांच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. गोविंदा आणि राकेश रोशन यांसारख्या बॉलीवूड स्टार्सनी देखील रेखांना डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या प्रसिद्ध शोमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. या शोमध्ये ते चित्रपट जगतातील आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक किस्सेही शेअर करायचे. अशाच एका एपिसोडमध्ये गोविंदा पोहोचला होता, त्यावेळी त्याला विचारण्यात आलं की, जगातील अशाच एका व्यक्तीचं नाव घे जिच्याबरोबर तुला डेटवर जायचं आहे?

हेही वाचा: ‘मला पुन्हा त्याचा चेहरा पाहायचा नाही…’, कृष्णा अभिषेकवर संतापली गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता गोविंदा म्हणाला, ‘मी रेखा जीचा खूप मोठा चाहता आहे, मला त्यांच्याबरोबर डेटवर जायला आवडेल.’ गोविंदाचे उत्तर ऐकून सिमी त्याला म्हणते, “राकेश रोशनने डेटवर जाण्यासाठी रेखाचं नाव घेतलं होतं.” दरम्यान, रेखांनी वयाची ६७ वर्ष पूर्ण केली आहेत, पण त्या आजही तितक्याच सुंदर दिसतात. रेखांचे अनेक चाहते आहेत.