बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा व भारतीय फलंदाज विराट कोहली लोकप्रिय कपल आहे. सोशल मीडियावर दोघे मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. गेल्या काही दिवसांपासून अनुष्का दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लवकरच अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता अनुष्काच्या दुसऱ्या गरोदरपणाबाबत उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक क्रिप्टिक ट्विट केले.

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्वीटमध्ये (एक्स) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अनुष्का व विराटच्या दुसऱ्या बाळाबाबत भाष्य केले आहे. गोयंका यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. एक नवीन बाळ काही दिवसांत जन्माला येणार आहे. आशा आहे की हे बाळ त्याच्या वडिलांसारखं क्रिकेटचं मैदान गाजवेल किंवा आईसारखं फिल्मस्टार होईल? या पोस्टबरोबर त्यांनी काही हॅशटॅगही वापरले आहेत. त्यांनी मेड इन इंडिया, टू बी बॉर्न इन लंडन हॅशटॅग वापरले आहेत.

गोयंका यांची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टवरून विराट व अनुष्काचे दुसरे मूल भारतात नाही तर लंडनमध्ये जन्माला येणार असल्याची चर्चा सुरू आहे. विराट व अनुष्काच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “सर हा निर्णय त्या मुलावरच सोडा, त्याच्याशी आपलं काही घेणंदेणं नाही. मात्र, होणाऱ्या बाळाच्या वडिलांकडून आम्हाला अजून मोठ-मोठे रेकॉर्ड करावे अशी मागणी आहे. तर दुसऱ्याने अजून जन्मालादेखील न आलेल्या बाळावर अपेक्षांचं ओझं टाकणं योग्य नाही, त्याचं आयुष्य नैसर्गिकरीत्या फुलू द्या’ अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनुष्का शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या झिरो’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर कतरिना कैफ व शाहरुख खानची प्रमुख भूमिका होती. आता ती लवकरच प्रोसित रॉय दिग्दर्शित ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.