एस.एस.राजामौली हे भारतातील सर्वात्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ‘बाहुबली’ पाठोपाठ त्यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट ऑस्कर नामांकनांवरून गेले काही दिवस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, संगीत, अभिनेता अशा विविध विभागांसाठी या चित्रपटाचं नाव ऑस्करसाठी पाठवण्यात आलं आहे. आता ऑस्कर विजेत्या निर्मात्याने या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कर मिळेल असं मत मांडलं आहे.

हॉलिवूडमधील ब्लूमहाऊस स्टुडिओचे संचालक जॅसन ब्लूम यांनी ‘गेट आउट’, ‘परानॉर्मल ऍक्टिव्हिटी’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांना ‘आरआरआर’ची भुरळ पडली आहे. एक ट्वीट करत त्यांनी या चित्रपटाला ‘बेस्ट फिल्म’ हा पुरस्कार मिळेल असं म्हटलं आहे.

आणखी वाचा : ‘RRR’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्यासाठी पुरस्कार मिळाला, पण…

त्यांनी ट्वीट करत लिहिलं, “‘आरआरआर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळेल. माझे शब्द लिहून घ्या आणि जर तसं झालं तर मी स्वतःला माझा स्वतःचा ऑस्कर देईन.” आता त्यांनी केलेलं हे ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटवर प्रेक्षक कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पुढे, ‘या’ दोन विभागांत नामांकन मिळण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातून १००० कोटींहून अधिक रकमेची कमाई केली. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार होते. दक्षिणात्य सुपरस्टार रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. त्यासोबतच या चित्रपटात बॉलीवूड स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसले. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट्ट आणि अजय देवगणने दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.