Indias Highest Paid Musician: चित्रपट, मालिका, वेब सीरिज, नाटक ही सर्व मनोरंजनाची साधने मानली जातात. यामध्ये गाणी, नृत्य यांनाही तितकेच महत्त्व आहे. चित्रपट हे गाण्यांशिवाय अपूर्ण वाटतात, त्यामुळे गाण्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

भारतातील संगीत क्षेत्राला अनेक महान गायक लाभले आहेत. दिवगंत गायिका लता मंगेशकर यांच्यापासून ते सुरेश वाडकर, आशा भोसले, सुनिधि चौहान, श्रेया घोषाल, अलका याज्ञिक, किशोर कुमार, सोनू निगम, अरिजीत सिंग अशा अनेक गायकांचा समावेश आहे.

तब्बल ‘इतके’ कोटी मानधन घेत ‘या’ गायकाने रचला इतिहास

मनोरंजनसृष्टीत असा एक काळ होता, जेव्हा लता मंगेशकर तसेच मोहम्मद रफी यांसारख्या दिग्गज गायकांना त्यांचे ५०० रुपयांहून अधिक मानधन मिळवण्यासाठी झगडावे लागत होते. मात्र, त्याचदरम्यान लोकप्रिय कलाकारांना प्रत्येक चित्रपटासाठी लाखो रुपये मानधन मिळत असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता गायक त्यांच्या प्रत्येक गाण्यासाठी लाखो रुपये कमावतात. एका अल्बमसाठी एक कोटीहून अधिक मानधन घेत असल्याचे दिसते. आता ही चर्चा होण्याचे कारण म्हणजे एका गायकाने संगीत क्षेत्राच्या इतिहासात एका अल्बमसाठी सर्वात जास्त मानधन घेतल्याचे समोर आले आहे.

हिंदूस्तान टाइम्सनुसार, लोकप्रिय गायक मिथुनने त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी २५ कोटींहून अधिक मानधन घेतले आहे. मिथुनने याआधीदेखील या प्रोजेक्टच्या दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. जवळजवळ दोन दशकांहून अधिक काळासाठी ते एकमेकांना ओळखतात. केवळ एकाच अल्बमसाठी एवढी किंमत मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ए. आर रेहमान, अरिजीत सिंग यांना टाकले मागे

मिथुनच्या आधी अनिरुद्ध रविचंदरने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील गाण्यांसाठी १० कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेण्याचा विक्रम केला होता. विशेष बाब म्हणजे अनिरुद्धने त्याच्या नंतरच्या चित्रपटांसाठी त्याचे मानधन कमी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाईम्स ऑफ इंडियानुसार, त्याने ‘लिओ’ आणि ‘जेलर’साठी प्रत्येकी आठ कोटी रुपये घेतले होते. ए. आर. रेहमान प्रत्येक चित्रपटासाठी आठ कोटी रुपये मानधन घेतात. तसेच प्रीतम, विशाल-शेखर, हे प्रत्येक चित्रपटासाठी पाच कोटी मानधन आकारतात. खासगी अल्बमसाठी गायक एक कोटींपेक्षा जास्त पैसे कमवू शकतात.