जान्हवी कपूर अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. जान्हवीने या वीकेंडला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्याला ती एकटीच गेली नसून तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियादेखील होता. आता जान्हवीने या सोहळ्यातील खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

नुकतेच जान्हवीने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील शिखरबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये जान्हवी शिखरचा हात पकडून चालतेय असं दिसतंय. दोघंही अगदी आनंदी दिसतायत. जान्हवीने शेअर केलेल्या या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिलं, “हा सगळ्यात सुंदर वीकेंड होता, सगळ्या गोड आठवणींसाठी धन्यवाद.”

जान्हवी कपूर आणि शिखर पहारियासह सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर-आलिया भट्ट, शनाया कपूर, इब्राहिम अली खान, सारा अली खान अशा बर्‍याच बॉलीवूड सेलिब्रिटींनी या भव्य सोहळ्याला हजेरी लावली होती.

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने दिलं रिंकू राजगुरूला वाढदिवसानिमित्त ‘हे’ खास सरप्राईज, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील युरोपमधील फोटोंसह जान्हवी कपूरने तिच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरचे काही मौल्यवान क्षणदेखील शेअर केले आहेत. यात एक व्हिडीओ आहे, ज्यात चित्रपटगृह अगदी हाऊसफुल्ल दिसतंय.

जान्हवीने ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचादेखील फोटो शेअर केला आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत १९.३३ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा… VIDEO: रागावलेल्या ऐश्वर्या नारकर यांचा रुसवा घालवताहेत अविनाश नारकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “छोट्या भांडणानंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जान्हवीने काही महिन्यांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात बहीण खुशीबरोबर हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने वैयक्तिक आयुष्याबद्दलही खुलासा केला होता. या दरम्यान जान्हवीने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीही दिली होती.

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे; तर अभिनेत्री ‘देवरा: भाग १’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. जान्हवीने ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे.