Kangana Ranaut reacts on Raja Raghuwanshi Murder Case : राजा रघुवंशी याची मेघालयात हनिमूनवर असताना हत्या झाली. या हत्या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशी सहभागी आहे. तिनेच बॉयफ्रेंडबरोबर मिळून पतीची हत्या केली, असा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपा खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांनीही मेघालय हनिमून हत्याकांडाबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रणौत यांनी राजाची पत्नी सोनम रघुवंशीला ‘मूर्ख’ म्हटलं आहे. तसेच तिने अत्यंत निर्दयीपणे पतीची हत्या केली असंही म्हटलं आहे. कंगना रणौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लिहिलं, “हे किती भयंकर आहे!! एक महिला लग्नाला नकार देऊ शकत नाही, कारण तिला तिच्या स्वतःच्या आई-वडिलांची भीती वाटते; पण दुसरीकडे ती सुपारी किलर्सबरोबर मिळून अत्यंत निर्दयीपणे खून करायचा कट रचते. सकाळपासून माझ्या डोक्यात हेच फिरतंय!!! उफ्फफफ आता डोकं दुखत आहे!! ती घटस्फोटही घेऊ शकली नाही किंवा तिच्या प्रियकरासोबत पळूनही जाऊ शकली नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “किती क्रूर, घृणास्पद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे किती मूर्ख आहे ती. मूर्ख लोकांना कधीही हलक्यात घेऊ नये. ते समाजासाठी सर्वात मोठा धोका असतात… आपण अनेकदा त्यांच्यावर हसतो आणि ते हानी पोहोचवणार नाही, असं समजतो पण ते चुकीचं आहे. बुद्धी असलेले लोक स्वतःच्या भल्यासाठी इतरांचे नुकसान करू शकतात, पण लक्षात ठेवा की मूर्ख व्यक्तीला ते काय करत आहेत याची काहीच कल्पना नसते !!! तुमच्या आजूबाजूच्या अशा मूर्खपणाबद्दल जागरूक राहा.”

कंगना रणौत यांची पोस्ट-

Kangana Ranaut calls Raja Raghuvansh wife Sonam dumb
कंगना रणौत यांची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

नेमकं प्रकरण काय?

राजा रघुवंशी व सोनम २३ मे रोजी मेघालयात हनिमूनसाठी गेले होते. तिथून राजा व सोनम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. २ जून रोजी एका दरीत राजाचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी हत्या समजून तपास सुरू केला, कारण सोनम बेपत्ता होती. मेघालय पोलिसांना संशय होता की सोनमने तिच्या पतीला मारण्यासाठी मारेकऱ्यांना पैसे दिले होते आणि शेवटी तेच झडलं.

मध्य प्रदेश पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की सोनमचे २१ वर्षीय राज कुशवाहाबरोबर प्रेम संबंध होते. सोनमने त्याच्याबरोबर मिळून पती राजाला मारण्याचा कट रचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने रविवारी रात्री गाझिपूर जिल्ह्यातील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर तिला अटक करण्यात आली, तर राज कुशवाहला इंदूरमध्ये अटक करण्यात आली. पीटीआयनुसार, या प्रकरणात सोनमबरोबर इतर चार आरोपी आहेत. आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान, राज सिंह कुशवाह आणि आनंद अशी त्यांची नावं असून या सर्वांना मध्य प्रदेशच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे.