अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल बॉलीवूडमधलं लोकप्रिय कपल आहे. सध्या विकी आणि कतरिना गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतायत.

अनेकदा विकी आणि कतरिनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या कपलचे लाखो चाहते असल्याने अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चाहत्यांना पाहायला आवडतात. अशातच आता या कपलचा लंडनमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हेही वाचा… कान फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने नाकारला होता ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; म्हणाली, “जर मला काम…”

कतरिना आणि विकीच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ते लंडनच्या स्ट्रीटवर फिरताना दिसतायत. कतरिनाने काळ्या रंगाचं जॅकेट, जीन्स आणि शूज परिधान केलेले दिसतायत; तर विकीने निळ्या रंगाची जीन्स, तपकिरी रंगाचे बूट आणि त्यावर जॅकेट घातलेलं दिसतंय. यात लक्ष वेधणारी गोष्ट अशी की दोघंही झेब्रा क्रॉसिंगमधून रस्ता क्रॉस करत असताना त्यांचं शूट होतंय हे कतरिनाच्या लक्षात येताच तिने विकीला मागे खेचलं.

याआधी कतरिना आणि विकीचा लंडनमधलाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले होते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ तरी करू नका, त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या, अशा कमेंट्स अनेकांनी त्या व्हिडीओवर केल्या होत्या. आता या व्हिडीओवरदेखील नेटकऱ्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “खरंतर कतरिना भडकली आहे, त्यांनापण त्यांची प्रायवसी हवी असते.” तर दुसऱ्याने संताप व्यक्त करत कमेंट केली आणि लिहिलं, “प्रत्येक जागी त्यांना त्रास देणं बंद करा, त्यांना प्रायवसी द्या. तुमच्या कॅमेरासाठी त्यांनी जन्म घेतलेला नाही.”

हेही वाचा… “मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण…”, गौरी खानचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, म्हणाली…

अनेकांनी असंही म्हटलंय की, कतरिनाने व्हिडीओ शूट करताना पाहिला आणि विकीला मागे खेचलं. कतरिना आणि विकीचा हा व्हिडीओ पहिल्यांदा रेडिटवरून व्हायरल झाला.

हेही वाचा… ठरलं तर मग: साक्षीला होणार तुरुंगवास? अर्जुन-सायलीच्या मदतीने अखेर शिवानी देणार खरी साक्ष; पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कतरिना आणि विकीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल रश्मिका मंदानाबरोबर दिसणार आहे. अ‍ॅमी विर्क आणि तृप्ती डिमरीबरोबर विकी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटातही झळकणार आहे; तर कतरिना फरान अख्तरच्या ‘जी ले जरा’ चित्रपटात प्रियांका चोप्रा व आलिया भट्टबरोबर दिसणार आहे.