बॉलिवूड किंग शाहरुख खान केवळ त्याच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या विनोदबुद्धीसाठीही ओळखला जातो. शाहरुख खानला बॉलीवूडचा बादशाह म्हटले जाते, आणि तो खऱ्या अर्थाने राजाही आहे. शाहरुखची जीवनशैली राजापेक्षा कमी नाही. पण शाहरुख खानची एकूण संपत्ती किती? शाहरुख खान की अमिताभ बच्चन यांच्यापैकी सगळ्यात श्रीमंत कोण? तुम्हाला माहिती आहे का, नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

हेही वाचा- मुस्लीम असल्याने सासरच्या मंडळींनी बदललेलं शाहरुख खानचं नाव; खुद्द गौरीने केलेला खुलासा

शाहरुख खान केवळ अभिनयाच्या बाबतीतच नाही तर कमाईच्या बाबतीतही अव्वल आहे. ३० वर्षांच्या कारकिर्दीत शाहरुख खानने खूप नाव, प्रसिद्धी आणि संपत्ती कमावली आहे. शाहरुख खान ७३५ दशलक्ष डॉलर्सचा मालक आहे. म्हणजेच त्यांची संपत्ती ६०१० कोटी रुपये आहे. शाहरुख खानचा पगार २४० कोटींहून अधिक असून, दर महिन्याला अभिनेता १२ कोटी कमावतो. शाहरुख खानने ही संपत्ती केवळ चित्रपटांमध्ये काम करूनच नाही तर रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन अंतर्गत चित्रपट आणि वेब सीरिजचे संपादन आणि निर्मिती करून कमावली आहे. २०२५ पर्यंत शाहरुख खानची एकूण संपत्ती १ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

चित्रपटांसाठी शाहरुख खान किती घेतो मानधन

बॉलिवूड स्टार शाहरुख खानने ३० वर्षांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपट केले आहेत. शाहरुख खान त्याच्या चित्रपटांसाठी करोडो रुपयांचे मानधन घेतो.

शाहरुख खानची संपत्ती किती?

शाहरुख खानकडे मुंबईत मन्नतसह अनेक मालमत्ता आहेत, शाहरुख खानचे अलिबागमध्ये फार्म हाऊसही आहे, जिथे किंग खान अनेकदा पार्टी करत असतो. २० हजार स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेले हे फॉर्म हाऊस Deja Vu Forms वर बांधले आहे. मन्नतची किंमत सुमारे २५० कोटी रुपये आहे. मुंबईत येणारे शाहरुखचे चाहते मन्नत भेट देतातच हा समुद्राभिमुख बंगला असून त्यात ६ मजले आहेत. या घरात लायब्ररी, शाहरुखचे ऑफिस, मुलांसाठी खास खोली आणि स्विमिंग पूल आहे. हे घर उभारण्यासाठी १० वर्षे लागली, असा खुलासा गौरी खानने एका मुलाखतीत केला होता.
शाहरुख खानचे दिल्लीतही घर आहे. शाहरुख खान दिल्लीत लहानाचा मोठा झाला, त्यामुळे या अभिनेत्याचे दिल्लीशी विशेष नाते आहे. दिल्लीतल घर गौरी खानने डिझाइन केले आहे. हे घर दक्षिण दिल्लीत आहे.

हेही वाचा- सासूने रेखा यांना मारायला उगारलेली चप्पल; अवघ्या दोन महिन्यात मोडलेलं प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न

दुबईतही आहे शाहरुख खानचे अलिशान घर

किंग खानचे दुबईवर विशेष प्रेम आहे. तो दुबईचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे. शाहरुख खानचे दुबईतील जुमेरा बीचवर एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत १८ कोटींहून अधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यात श्रीमंत कोण?

जर आपण शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांची तुलना केली तर किंग खान शहेनशाहपेक्षा खूप श्रीमंत आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती ३३९० कोटी रुपये आहे. अमिताभ दर महिन्याला ५ कोटी कमावतात.