बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मराठी खाद्यपदार्थांच्या प्रेमात आहेत. दुसऱ्या शहरातून करिअर करण्याच्या निमित्ताने मुंबईत येऊन त्यांनी इकडची खाद्यसंस्कृती आपलीशी केली आहे. यातीलच एक म्हणजे क्रिती सेनॉन. आता नुकतंच तिने तिला पाणीपुरी आवडते की वडापाव हे सांगितलं आहे.

क्रिती सेनॉन खूप फूडी आहे. आतापर्यंतच्या अनेक मुलाखतींमध्ये तिने तिचं विविध पदार्थांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. तर आता नुकतंच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक ‘आस्क मी’ सेशन घेतलं. या तिला चाहत्यांनी विविध प्रश्न विचारले आणि त्याची क्रितीनेही हसत हसत उत्तरं दिली. याच सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं की, ” तुला पाणीपुरी आवडते की वडापाव?” यावर क्रितीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ-कियारा पाठोपाठ प्रभास-क्रिती सेनॉन करणार त्यांचं नातं ऑफिशिअल? साखरपुड्यासंबंधित ‘ते’ ट्वीट चर्चेत

या प्रश्नाचे उत्तर देताना तिचा एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली, “मला पाणीपुरी खूप आवडते. मी ती कधीही खाऊ शकते. आधी मी त्याला गोलगप्पे म्हणायचे पण मुंबईत राहायला आल्यापासून मी त्याला पाणीपुरी म्हणू लागले. मला आत्ताही पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे. आज शूटिंग झाल्यानंतर मी ती नक्की खाईन.”

हेही वाचा : Video: उर्फी जावेदने तिच्या हटके ड्रेसचं केलं नामकरण, कतरीना कैफच्या ‘या’ गाण्यावरून दिलं नाव, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिती सेनॉनचा हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. हे सेशन संपताच रात्री तिने पाणीपुरी देखील खाल्ली. पाणीपुरी खाताना असा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि पाणीपुरीचा आस्वाद घेत असल्याचं तिने चहा त्यांना दाखवलं.