Video : रात्रीच मरीन ड्राईव्हला जाऊन बसली महेश मांजरेकरांची लेक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली... | mahesh manjekar daughter saiee marine driver late night video goes viral on social media | Loksatta

Video : रात्रीच मरीन ड्राईव्हला जाऊन बसली महेश मांजरेकरांची लेक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली…

सई मांजरेकरचा मरीन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : रात्रीच मरीन ड्राईव्हला जाऊन बसली महेश मांजरेकरांची लेक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली…
सई मांजरेकरचा मरीन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

महेश मांजरेकरांची लेक सई मांजरेकर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच तिने सलमान खानसह चित्रपट केला. सईला रुपेरी पडद्यावर पाहणं प्रेक्षकांनीही पसंत केलं. सईची सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. ती तिच्या दिनक्रमाबाबत बऱ्याच गोष्टी इन्स्टाग्रामद्वारे शेअर करताना दिसते. आताही तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले

सईने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मरीन ड्राईव्हचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वतः मरीन ड्राईव्हला बसलेली दिसत आहे. तसेच सईच्या हातात चहाचा एक कप दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही विशेष पसंतीस पडला आहे.

सईने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “रात्री मरीन ड्राईव्हला बसून मी जशी चहा पित आहे तसं तुम्ही केलं नसेल तर…” सईच्या या व्हिडीओबरोबर ‘ये दिल है ये मुश्किल जिना यहाँ’ हे गाणं ऐकायला मिळत आहे.

आणखी वाचा – हार्दिक जोशी व अक्षया देवधरची लगीनघाई, तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, फोटो व्हायरल

सईच्या या व्हिडीओला ९० हजारापेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. सईने ‘दबंग ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने या चित्रपटात अभिनेता सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. ‘मेजर’ या चित्रपटातली तिची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:25 IST
Next Story
Video: अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, ‘जय हिंद’ म्हणताच…