मंदिरा बेदीने बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही काळ इंडस्ट्रीपासून दूर असतानाही मंदिरा बेदीने २०२३ ची दमदार सुरुवात केली आहे. मंदिरा बऱ्याच काळानंतर क्रिकेटच्या रिअॅलिटी शोमधून पुनरागमन करत आहे. ती लवकरच ‘क्रिकेट का टिकट’ हा रिअॅलिटी शो होस्ट करणार आहे. त्यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने तिच्या नवीन प्रोजेक्ट्सबद्दल तसेच तिच्या पतीच्या निधनानंतरच्या आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मंदिरा बेदी म्हणाली, “२०२३ हे वर्ष माझ्यासाठी खूप आशादायक आहे. मी ‘क्रिकेट का टिकट’च्या माध्यमातून नवीन वर्षाची सुरुवात करत आहे. त्यानंतर अजून बरेच प्रकल्प आहेत. मी काही स्क्रिप्ट्स देखील वाचत आहे, सध्या तर फक्त वाचत आहे आणि मी काही प्रोजेक्ट्सना होकार देईन अशी आशा आहे. नवीन सुरुवात करणं मला आवडतं. या वर्षी मी एक नवीन सुरुवात करणार आहे.”

आणखी वाचा- पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर ट्रोल होताच केली ‘ही’ गोष्ट

या वर्षाची सुरुवात एका नवीन रिअॅलिटी शोपासून करणार असल्याबद्दल मंदिरा बेदीने या मुलाखतीत सांगितलं. “हा रिअॅलिटी शो स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा शो आहे, असा शो याआधी कधीच झाला नव्हता. मी केलेल्या लाइव्ह टेलिकास्टपेक्षा हे खूप वेगळं आहे, म्हणूनच मी या शोसाठी खूप उत्सुक आहे.” असं मंदिरा बेदी म्हणाली.

आणखी वाचा- “माझ्या छोट्या केसांमुळे नकारात्मक…” मंदिरा बेदीनं केला धक्कादायक खुलासा

मंदिरा बेदीचा पती दिग्दर्शक राज कौशलचं २०२१ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. राज कौशलने ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. मंदिरा बेदीने १९९९ मध्ये राज कौशलशी लग्न केलं होतं. पतीच्या मृत्यूबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझं आयुष्य बदललं आहे. गेल्या दोन वर्षांत माझ्याकडे खंबीर होण्याशिवाय पर्याय नव्हता. मी आता खूप खंबीर व्यक्ती आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती पुढे म्हणाली, “तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीला किंवा तुमच्या पार्टनरला गमावणं हा एक जीवन बदलून टाकणारा अनुभव आहे. अशा घटनेनंतर तुम्ही एकतर बुडू शकता किंवा पोहू शकता आणि मी पोहणं निवडलं आहे. मला दोन लहान मुले आहेत, माझं कुटुंब आहे. माझ्याकडे पोहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”