Madhu Mantena Ira Trivedi Wedding: भारतीय चित्रपट निर्माता मधू मंटेनाने इरा त्रिवेदीशी लग्नगाठ बांधली आहे. ११ जून रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडला, तर त्याच दिवशी संध्याकाळी दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मधू व इरा यांचे लग्न व रिसेप्शनमधील फोटो व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने पोहोचला कोकणातील गावी, त्याचं टुमदार कौलारू घर पाहिलंत का?

लग्नामध्ये वधू इरा गुलाबी कांजीवरम साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती, तर मधूने पारंपारिक धोती आणि कुर्ता परिधान केला होता. दरम्यान, इरा त्रिवेदीने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. यात ते दोघे एकमेकांच्या वरमाला दिसत आहेत. “मी आता पूर्ण झाले आहे,” असं कॅप्शन इराने या फोटोंना दिलंय.

इरा व मधू यांच्या रिसेप्शनला हृतिक रोशन, राजकुमार राव, आमिर खान, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, जहीर इकबाल, रकुल प्रीत, जॅकी भगनानी, क्रिती खरबंदा, पुलकित सम्राट यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

मधू आणि इरा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. मधूने ‘गजनी’, ‘अग्ली’ आणि ‘क्वीन’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधूने यापूर्वी डिझायनर मसाबा गुप्ताशी लग्न केलं होतं, पण दोघांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला. मसाबानेही काही महिन्यापूर्वी अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली.