Metro In Dino box office collection day 3: ‘मेट्रो इन दिनों’ हा चित्रपट ४ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला. लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग बसूने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अली फजल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर हे कलाकार दिसत आहेत. या चित्रपटात चार प्रेमकथा पाहायला मिळत आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. आता या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत प्रत्येक दिवशी किती कमाई केली आणि त्या तीन दिवसांत एकूण मिळून किती कमाई केली,हे जाणून घेऊ…

‘लाइफ इन मेट्रो’च्या एकूण कलेक्शनला टाकले मागे

सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ७.२५ कोटींची कमाई केली आहे. तर, पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३.५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने सहा कोटींची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची पहिल्या तीन दिवसांतील एकूण कमाई १६.७५ कोटींची झाली आहे.

‘मेट्रो इन दिनों’ हा २००७ साली प्रदर्शित झालेल्या लाइफ इन मेट्रो या चित्रपटाचा सीक्वेल आहे. या चित्रपटात इरफान खान आणि कोंकणा सेन प्रमुख भूमिकांत होते. या चित्रपटाने एकूण १५.६३ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचे समीक्षाकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. त्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आजही लाइफ इन मेट्रो चित्रपटाचे कौतुक होताना दिसते. त्यानंतर चित्रपटाला त्यामुळे ‘मेट्रो इन दिनों’ ने या त्याच्या पहिल्या भागाला कमाईबाबत मागे टाकले आहे.

आता मेट्रो इन दिनों हा चित्रपट इतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांशी स्पर्धा करत आहे. आमिर खान व जिनिलीया देशमुख यांचा सितारे जमीन पर, काजोलचा माँ हे चित्रपटदेखील सध्या थिएटरमध्ये आहेत. २० जूनला प्रदर्शित झालेल्या सितारे जमीन पर या चित्रपटाने १४८.८ कोटींची कमाई केली आहे. तर माँ चित्रपटाने ३१.६ कोटींची कमाई केली आहे. हॉलीवूडचे काही चित्रपटदेखील नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या सगळ्यांमध्ये अनुराग बासूचा मेट्रो इन दिनो हा चित्रपट त्याचे स्थान निर्माण करताना दिसत आहे.

याबरोबरच जुलै महिन्यात राजकुमार रावचा ‘मालिक’, विक्रांत मेस्सी व शनाया कपूर यांचा ‘आँखों की गुस्ताखियां’, दिग्दर्शक मोहित सुरी यांचा ‘सैयारा’, अजय देवगण व अभिनेत्री मृणाल ठाकू सन ऑफ सरदार २, सिद्धार्थ मल्होत्रा व जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला परम सुंदरी, अनुपम खेर दिग्दर्शित तन्वी द ग्रेट हे चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी काळात मेट्रो इन दिनों चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.