Naseeruddin Shah dances with Neena Gupta: शनिवारी (१ नोव्हेंबर) पृथ्वी थिएटर फेस्टिवलचे उदघाटन झाले. यावेळी फेस्टिवलमध्ये नसीरुद्दीन शाह, सैफ अली खान, नीना गुप्ता, रत्ना पाठक शाह, महेश भट्ट, पूजा भट्ट या कलाकारांनी हजेरी लावली होती.
हे फेस्टिवल १७ दिवस सुरू असणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत हे फेस्टिवल सुरू असणार आहे. त्यामध्ये विविध परफॉर्मन्स सादर केले जाणार आहेत.
आता सोशल मीडियावर पृथ्वी थिएटरच्या अधिकृत हँडलने उदघाटन सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नसिरुद्दीन शाह, सैफ अली खान , नीना गुप्ता हे आणि इतर कलाकार एकत्र पोज देताना दिसत आहेत. तसेच काही कलाकार डान्स करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्याबरोबरच विनय पाठक, आहाना कुमरा, ‘बंदिश बॅण्डिट्स’फेम अभिनेत्री श्रेया चौधरी, दिव्या दत्ता, झोया अख्तर, अभिनेता मकरंद देशपांडे, प्रतीक गांधी, डिझायनर मसाबा गुप्ता, अभिनेता सत्यदीप मिश्रा हे कलाकारदेखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. विशाल व रेखा भारद्वाज यांनीदेखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
सोशल मीडियावर हे फोटो पाहिल्यानंतर अनेक कलाकारांनी कमेंट्स करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिया मिर्झाने लिहिले, “मी तुमच्याबरोबर तिथे असायला हवे होते”, नीना गुप्ता यांनी लिहिले, “सुंदर फोटो”, तर आमिर खानची लेक इराने लिहिले, “मी या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. मला अस्वस्थ वाटत आहे”, तर नेटकऱ्यांनी खूप सुंदर फोटो असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.
एका फोटोमध्ये नीना गुप्ता आणि नसीरुद्दीन शाह डान्स करताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये सैफ अली खान कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. एका फोटोमध्ये महेश भट्ट, पूजा भट्ट दिसत आहे. एका फोटोमध्ये रत्ना पाठक हसताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये सोनाली कुलकर्णीदेखील दिसत आहे.
विविध फोटोंमध्ये हे कलाकार एकमेकांशी बोलताना, गप्पा मारताना, हसताना दिसत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. काही जण प्रेमाने एकमेकांना भेटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कलाकारांच्या या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
दरम्यान, हे सर्वच कलाकार बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार आहेत. कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून हे कलाकार कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात.
