सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा २०२३ सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. या चित्रपटाने आतापर्यंत १ हजार कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होत आहे, मात्र एका पाकिस्तानी अभिनेत्याने या चित्रपटावर टीका केली आहे.

हेही वाचा- परिणीती चोप्राशी लग्न कधी करणार? या प्रश्नावर खासदार राघव चड्ढा लाजत म्हणाले…

पाकिस्तानी अभिनेता यासिन हुसैन याने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटाबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले की, ‘जर तुम्ही मिशन इम्पॉसिबल १ देखील पाहिला असेल, तर शाहरुख खानचा पठाण हा एका कथाविरहित व्हिडिओ गेमपेक्षा अधिक काही दिसत नाही.’


हेही वाचा- VIDEO : परिणीती- राघव चड्डा यांच्या लग्नाची तयारी सुरु?; अभिनेत्री आणि मनीष मल्होत्राच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे पाकिस्तानी अभिनेता यासिर हुसैन?

यासिर हुसेन हा एक पाकिस्तानी अभिनेता आणि पटकथा लेखक आहे, जो त्याच्या अनेक कॉमिक भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने ‘आफ्टर द मून’ हा शो होस्ट केला आहे. याशिवाय २०१८ साली यासिरने केलेल्या बंदी या सामाजिक नाटकातील नकारात्मक भूमिकेनंतर तो चर्चेत आला होता.
थिएटरमध्ये करोडोंची कमाई केल्यानंतर, पठाण हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमने नकारात्मक भूमिका साकारली आहे. याशिवाय आशुतोष राणा, डिंपल कपाडिया हे कलाकारही या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधला हा चौथा चित्रपट आहे. याआधी फ्रँचायझीमध्ये आलेल्या ‘वॉर’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.