अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांनी २४ स्पप्टेंबरला लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये या शाही लग्नाचे आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नाला बॉलीवूडसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. परिणीती आणि राघव यांनी लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत. या फोटोंवर अनेकांनी कमेंट करत त्यांच अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा- Video: “परिणीतीला काय गिफ्ट दिलं?” खुलासा करत प्रियांका चोप्राची आई म्हणाली, “त्यांच्या लग्नात…”

दरम्यान लग्नानंतर राघव आणि परिणीती दिल्लीत दाखल झाले. दिल्ली विमानतळावरील दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी परिणीती नियॉन रंगाचा ड्रेस, हातात चुडा, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक लूकमध्ये दिसली. यावेळी परिणीतीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. परिणीतीच्या मंगळसूत्रात इन्फिनिटी (Infinity symbol) चिन्ह पाहायला मिळत आहे. त्या इन्फिनिटी चिन्हाच्या बरोबर मधोमध गोलाकार मोठा हिरा आहे. या मोठ्या हिऱ्याच्या वर आणखी दोन छोटे हिरे आहेत. तसेच मंगळसूत्रात काळे मणी आणि सोन्याची बारीक चेनही आहे.

परिणीतीच्या या मंगळसूत्राची डिझाईन बहिण प्रियांका चोप्राच्या मंगळसूत्राच्या डिझाईनशी मिळतं जुळत आहे. २०१८ मध्ये प्रियांकाने हॉलिवूड गायक निक जोनासबरोबर लग्न केलं. लग्नात निकने प्रियांकाला एलीगेंट मंगळसूत्र घातलं होतं. प्रियांकाच्याही मंगळसूत्रात एक मोठा हिरा आहे. त्या हिऱ्याच्या वर तीन छोटे डायमंड आहेत. प्रियांकाच्या मंगळसूत्रातही सोन्याची बारीक चेन आणि काळी मणी ओवले आहेत.

हेही वाचा- “ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच हे जोडपं जवळच्या मित्रमंडळींना दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. मुंबईतील रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे.