बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच परिणीती आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. आता लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून परिणीतीच्या मेहंदीचा पहिली फोटो समोर आला आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं सुख कशात आहे माहितेय? जाणून घ्या

लग्नासाठी परिणीती १७ सप्टेंबरला मुंबईहून दिल्लीत पोहोचली. त्यानंतर १९ सप्टेंबरला परिणीतीच्या हातावर राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी काढली. लग्नापूर्वीच्या पहिल्या विधीचा फोटो आला समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ

हा व्हायरल झालेला फोटो गुरुद्वारमधील आहे. यामध्ये परिणीतीच्या हातावर रंगलेली मेहंदी पाहायला मिळत आहे. सध्या पेस्टल कलरचा सीझन सुरू असल्यामुळे परिणीती आणि राघव चड्ढा यांनी देखील पेस्टल कलरचे कपडे परिधान केले आहेत. परिणीती पेस्टल कलरच्या सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

हेही वाचा – लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर दुर्दैवी घटना; लाइटमनचा विजेच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान, परिणीती आणि राघव चड्ढा यांचं घर सजलं आहे. पाहुणे मंडळी येण्यास सुरुवात झाली आहे. पंडारा रोड स्थित असलेलं राघव यांच्या घराजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: “जेलमध्ये जाऊन आला तरी सुधारला नाही” राज कुंद्रा आणि ईशा गुप्ताच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहितीनुसार, २३ सप्टेंबरला परिणीती आणि राघव चड्ढा राजस्थान येथील उदयपूरला रवाना होणार आहेत. इथे गेल्यानंतर पहिल्यांदा चुडा भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम असणार आहे. मग दुसऱ्यादिवशी २४ सप्टेंबरला राघव चड्ढा यांचा सेहराबंदी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दोघं सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. या शाही लग्नसोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापासून ते राज्यसभेचे सदस्य कपिल सिब्बल यांच्यापर्यंत सर्वांना आमंत्रित केलं आहे. तसेच परिणीतीकडून अनेक बॉलीवूडचे सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.