‘बॉयकॉट बॉलिवूड’ सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होणारा हॅशटॅग आहे. ज्या बॉलिवूडने एकेकाळी हाऊसफुलच्या पाट्या बघितल्या आहेत, त्याच बॉलिवूडला रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागत आहेत. ‘लाल सिंग चड्डा’, ‘रक्षा बंधन’, ‘दोबारा’, ‘बच्चन पांडे’, ‘ब्रह्मास्त्र, ‘लायगर’, अशा अनेक बिग बजेट चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार घातला. ‘ब्रह्मास्त्र’ सोडल्यास कोणताही चित्रपट चांगली कमाई करू शकला नाही. आता शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

आणखी वाचा : आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिका उत्सुक; स्टोरी शेअर करत म्हणाली…

काल बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा काल वाढदिवस झाला. यानिमित्त शाहरुखच्या चाहत्यांना खास भेट मिळाली. ती म्हणजे बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर काल प्रदर्शित झाला. बऱ्याच दिवसांपासून चाहते या टीझरची वाट पाहत होते. पण शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक लोकांसमोर आणली. किंग खानच्या या अॅक्शनपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर लोकांना खूप आवडला आहे. मात्र काहींनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.

‘पठाण’ हा चित्रपट इतर काही चित्रपटांची कॉपी आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी या चित्रपटाच्या टीझरला ट्रोल केले आहे. तर काहींनी शाहरुख खानने काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्ये शेअर करत या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

या चित्रपटातील अ क्शन सीन्स अनेक प्रेक्षकांना आवडलेले नाहीत. अशा अनेक कारणांमुळे या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.

हेही वाचा : शाहरुखला वाढदिसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्री ‘मन्नत’बाहेर चाहत्यांची गर्दी; किंग खान आला आणि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यापूर्वी सिद्धार्थ यांनी ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता ‘पठाण’ हा त्यांचा तिसरा अॅक्शनपट आहे. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.