नाग अश्विन दिग्दर्शित ‘प्रोजेक्ट के’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. एवढंच नाही तर चित्रपटाच्या नावातही बदल करण्यात आला आहे.
चित्रपटाचे नाव ‘प्रोजेक्ट के’ वरून बदलून ‘कल्की २८९८ एडी’ असं करण्यात आले आहे. त्याचा टीझर सॅन डिएगो कॉमिक-कॉन येथे ‘This is Project K: First Glimpses of India’s Mytho-Sci-Fi Epic’ या शीर्षकासह प्रदर्शित करण्यात आला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित आणि वैजयंती मूव्हीज निर्मित हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा- प्रसिद्ध अभिनेता चौथ्यांदा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म; फोटो पोस्ट करत म्हणाला…
तसेच ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, ‘प्रोजेक्ट के’ २०२४च्या ईदला रिलीज होणार होता. मात्र त्याच दिवशी सलमान खान आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचाही एक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने ‘प्रोजेक्ट के’च्या निर्मात्यांना ही टक्कर टाळायची आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
हेही वाचा- जिनिलीयाला मिळालेला नाव बदलण्याचा सल्ला, ‘हे’ सुचवलेलं नाव; म्हणाली, “मला प्रत्येकजण…”
काही दिवसांपूर्वी ‘प्रोजेक्ट के’ मध्ये दीपिका पदूकोणचा लूक व्हायरल झाला होता. त्या पाठोपाठ या चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला आहे. आता या ‘प्रोजेक्ट के’च्या लूकवरुन नेटकऱ्यांनी प्रभासला ट्रोल केलं होतं. या नव्या पोस्टरमध्ये प्रभास हा एका भक्कम अशा पोलादी पोषाख करून एकदम अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये प्रभासचा पोशाख आणि एकंदर त्याचा अवतार पाहता लोकांनी हे पोस्टर मार्वल कॉमिकच्या ‘आयर्न मॅन’च्या पोस्टरवरुन चोरल्याचा आरोप केला आहे. ‘आयर्न मॅन’ आणि ‘प्रोजेक्ट के’च्या या पोस्टरमधील साम्य लोकांनी दाखवून दिलं आहे.