अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या आयपीएलमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काल मंगळवारी (३ जून) आयपीएल २०२५ ची सांगता झाली. या पर्वाच्या अंतिम सामन्यामध्ये प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्ज व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रतिस्पर्धी होते. परंतु, आरसीबीनं पंजाब किंग्जवर सहा धावांनी मात केली. त्यामुळे प्रीती झिंटाचा संघ कमी धावांच्या फरकामुळे आयपीएलच्या ट्रॉफीला मुकला.

या संपूर्ण मोसमात प्रीती झिंटा अनेकदा चर्चेचा विषय ठरली. प्रीती झिंटा फक्त अभिनयापुरती मर्यादित न राहता, ती पंजाब किंग्ज या संघाची मालकीण आहे. एवढंच नव्हे, तर याव्यतिरिक्तसुद्धा ती आणखी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. प्रीती झिंटानं सांगितलं होतं की, तिनं ३४ मुलींना दत्तक घेतले आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार ती या मुलींच्या शिक्षण, जेवण व कपडे यांचा सर्व खर्च करणार असल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं होतं. पुढे अभिनेत्री म्हणाली, “त्या आता माझ्या मुली आहेत. माझी जबाबदारी आहेत. मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात असेन आणि वर्षातून दोनदा त्यांची भेट घेईन

प्रीती झिंटाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिनं जीन गुडइनफसह २०१६ साली लॉस एंजेलिसमध्ये लग्न केलं होतं. तिचे पती जीन गुडइनफ आर्थिक विश्लेषक आहेत. प्रीती झिंटा व जीन गुडइनफ या दोघांना दोन मुलं आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. २०२१ साली सरोगसीमार्फत दोन मुलांना जन्म दिला. अशातच प्रीती झिंटानं इतर ३४ मुलींना दत्तक घेतलं असून, त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रीती झिंटाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं ‘दिल से’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यामध्ये तिच्यासह अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. त्यानंतर ती ‘सोल्जर’, ‘संघर्ष’, ‘क्या कहना’, ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘मिशन कश्मीर’, ‘फर्ज’, ‘चोरी चोरी चुपके चुपक’, ‘दिल चाहता है’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘दिल है तुम्हारा, ‘कोई मिल गया’, ‘कल हो न हो’, ‘लक्ष्य’, ‘दिलने जिसे अपना काहा’, ‘वीर झारा’, ‘खुल्लम खुल्ला प्यार करे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती.