अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अखेर हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेले अनेक दिवस रणबीर आणि श्रद्धा त्यांच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसले. आता त्यांच्या इतक्या दिवसांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटातून श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसत आहे. ट्रेलर पाहूनच त्यांच्यातली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. तर या चित्रपटाने रिलीजपूर्वी ॲडव्हान्स बुकिंगधूनही चांगली कमाई केली आहे. तर त्या पाठोपाठ पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांना खुश करण्यात यशस्वी झाला आहे.

आणखी वाचा : क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या मॅच फिक्सिंग घोटाळ्याचा होणार पर्दाफाश; नेटफ्लिक्सच्या नव्या माहितीपटाचा ट्रेलर प्रदर्शित

इतकंच नव्हे तर तर या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘पठाण’ला थेट टक्कर देत आहे. दोन्ही चित्रपटाच्या आयएमडीबी रेटिंगमध्ये चांगलीच चढाओढ आपल्याला दिसत आहे. ‘पठाण’ला आयएमडीबीवर १० पैकी ६.४ असं रेटिंग मिळालं आहे तर रणबीर श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी १० पैकी ६.७ असं रेटिंग मिळालं आहे. हे दोन्ही वेगळ्या धाटणीचे चित्रपट जरी असले तरी बॉक्स ऑफिसवरसुद्धा ‘तू झूठी मैं मक्कार’ उत्तम कामगिरी करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. तर या आठवड्याच्या शेवटी हा आकडा आणखी वाढेल असाही अंदाज वर्तवला जात आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.