शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. परदेशात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता अशातच या चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी रणबीर कपूरच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळणार आहे.

‘पठाण’ या चित्रपटासाठी शाहरुखचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता पठाणची सर्वत्र असलेली चर्चा पाहून इतर चित्रपटांनी देखील यात त्यांचा फायदा करून घेण्याचं ठरवलं आहे. ‘पठाण’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या दिवशीच चित्रपटाच्या शो दरम्यान एका मोठ्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे.

आणखी वाचा : कार्तिक आर्यनचा ‘शेहजादा’ पडला ‘पठाण’वर भारी, ‘या’ बाबतीत शाहरुखच्या चित्रपटाला टाकलं मागे

‘पठाण’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. याचवेळी रणबीर कपूरच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पठाण या चित्रपटाबरोबरच रणबीर कपूरच्या या चित्रपटाचा ट्रेलर ही पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. आता अखेर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पठाण’बरोबरच रणबिर कपूरच्या चाहत्यांना ही भेट देण्याचं ठरवलं आहे.

हेही वाचा : चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात रणबीर कपूरबरोबर श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसंच निर्माते बोनी कपूर हे या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करत आहेत. हा चित्रपट होळीच्या आसपास प्रदर्शित केला जाईल असं समोर येत आहे.