शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अखेर ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. हा चित्रपट पाहून रितेश देशमुखने खास पोस्ट केली आहेत.

जवान चित्रपटगृहात जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. हा चित्रपट पाहिल्यावर सर्वजण सोशल मिडियावर प्रतिक्रिया देत आहेत. रितेश देशमुखनेही हा चित्रपट पाहिला आणि त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : खऱ्या आयुष्यात ‘असा’ आहे शाहरुख खान! गिरीजा ओकने केला खुलासा, म्हणाली, “त्याच्या स्वभावाबद्दल जे काही बोललं जातं ते सगळं…”

त्याने आज एक ट्वीट करत लिहिलं, “सगळी कामं ठेवा आणि आधी चित्रपटगृहात जा. ‘जवान’ एक इमोशन आहे. हा एक वेगळा अनुभव आहे. थिएटरमध्ये जवान पाहताना जो अनुभव आला तो फारच कमाल होता. सगळीकडे टाळ्या, शिट्टया वाजत होत्या. शाहरुख खान हा बॉम्ब आहे. तो मेगास्टार आहे. तो ज्या ज्या सीनमध्ये आहे तो उत्कृष्ट आहे. अॅक्शन, इमोशन, रोमान्स, ड्रामा.. आणि काही बाकी आहे का? काय अप्रतिम चित्रपट बनवला आहे ! हार्दिक अभिनंदन शाहरुख खान आणि टीम.”

हेही वाचा : Jawan sequel: ‘जवान’च्या यशानंतर येणार ‘जवान २’? चित्रपटातून मिळाली मोठी हिंट

आता रितेशचं हे ट्वीट खूप चर्चेत आलं आहे. तर शाहरुखनेही या ट्वीटला रीप्लाय देत रितेशचे आभार मानले आहेत. दरम्यान, या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरातून १०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे.