Sanjay Dutt & Manyata Dutt : ‘रॉकी मेरा नाम’ म्हणत १९८१ मध्ये संजय दत्तने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. त्याच्या पहिल्याच सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं होतं. ८० च्या दशकात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये संजय दत्तच्या ‘रॉकी’ सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं. ८०-९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता म्हणून संजय दत्तला ओळखलं जातं आणि त्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

उत्तम अभिनय शैली असताना देखील संजय त्याच्या करिअरपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिला. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक मुली येऊन गेल्या हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. ‘संजू’ चित्रपटात देखील याविषयीचा उल्लेख करण्यात आला आहे. अभिनेत्याचं पहिलं लग्न रिचा शर्माशी झालं होतं. यानंतर संजू बाबा १९९८ मध्ये दुसऱ्यांदा मॉडेल रिया पिल्लेसह लग्नबंधनात अडकला होता. या दोघांचा दहा वर्षांचा संसार २००८ मध्ये मोडला. याचवेळी संजयच्या आयुष्यात मान्यताची एन्ट्री झाली होती. संजय व मान्यता २००८ मध्येच लग्नबंधनात अडकले.

मान्यता ही संजयच्या आयुष्यात केवळ आलीच नाही तर तिने आजन्म त्याला साथ देण्याचा निर्धार केला. संजयच्या पडत्या काळातही मान्यता त्याच्याबरोबर ठामपणे उभी होती. गेले १७ वर्षे हे दोघंही सुखाने संसार करत आहेत.

सध्या या जोडप्याचा एक रोमँटिक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. एका संगीत सोहळ्यात संजय दत्त व त्याची पत्नी मान्यता रोमँटिक गाण्यावर कपल डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. संजय दत्तच्या ‘वास्तव’ चित्रपटातील “मेरी दुनिया है…” या रोमँटिक गाण्यावर दोघांनी ठेका धरला होता. हा व्हिडीओ मान्यता दत्तने आपल्या इन्स्टा स्टोरीला देखील शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच तो ‘हाऊसफुल ५’ चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमात संजय दत्तसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ अशा दमदार कलाकारांची मांदियाळी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.