scorecardresearch

शाहरुखचा कॅमिओ असलेला ‘टायगर ३’मधील सीन लीक, ‘असा’ असेल भाईजन व किंग खानचा डॅशिंग अंदाज

सलमानसोबतच्या या त्याच्या अ‍ॅक्शन सीन्ससाठी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये सेट बनवण्याचं काम जोरात सुरू आहे.

salman and shahrukh

अभिनेता सलमान खानचे आगामी चित्रपट खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याच्या चाहत्यांचं लक्ष या चित्रपटाकडे वेधलं गेलं आहे. या चित्रपटात सलमान खानबरोबर किंग खान अर्थातच शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार आहे. पण आता त्यांचा हा सीन नक्की कसा असेल हे समोर आलं आहे.

‘टायगर ३’मध्ये शाहरुख खान कॅमिओ करणार ही हिंट खुद्द शाहरुखने त्याच्या ‘पठाण’ चित्रपटात दिली होती. ‘पठाण’मध्ये सलमान खानने कॅमिओ केला आहे. या चित्रपटात सलमानच्या तोंडी एक डायलॉग आहे. यात सलमान म्हणतो, “मी एका मोठ्या मिशनवर जात आहे. तेव्हा टायगरला पठाणची गरज भासू शकते. तू जिवंत असशील ना?” तर यावर पठाण देखील त्याला त्याच्या मिशनमध्ये मदत करण्याचं वचन देतो. तेव्हापासून ‘टायगर ३’मध्ये त्यांचा सीन कसा असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते. आता तो सीन कसा असेल हे लीक झालं आहे.

आणखी वाचा : Video: प्रदर्शनाआधीच सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपटाची व्हिडीओ क्लिप लीक, पाहा अभिनेत्याचा डॅशिंग अंदाज

मिडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी चित्रपटात सलमान शाहरुखच्या मदतीने तुरुंगातून पळून जाणार असा सीन ठेवला आहे. या कथेत टायगरला तुरुंगातून पळून जावं लागतं आणि पठाण त्याच्या मित्राच्या मदतीसाठी तिथे धावून जातो असं दाखवण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या सीनमध्ये लोकप्रिय भारतीय जिम्नॅस्टही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या जिम्नॅस्टची व्यक्तिरेखा खलनायकाची असून, तुरुंगात त्याच्याशी भांडण केल्यानंतर शाहरुख आणि सलमान एकत्र तुरुंगातून पळून जाताना दिसणार आहेत.

हेही वाचा : “आता पुरे…” सलमान खानच्या गायकीने नेटकरी हैराण, नव्या गाण्यामुळे भाईजान ट्रोल

सलमानसोबतच्या त्याच्या खास अ‍ॅक्शन सीन्ससाठी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये सेट बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. शाहरुख आणि सलमान पुढील महिन्यात या सीनचं शूटिंग करणार आहेत. तर सुमारे सुमारे दोन आठवडे याचं शूटिंग सुरू राहणार आहे असंही बोललं जात आहे. त्यामुळे आता सलमान आणि शाहरुखचे चाहते या दोघांना पुनः एकदा एकत्र बघण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:55 IST

संबंधित बातम्या