Siddharth Malhotra-Kiara Advani Wedding : शुभमंगल सावधान! लग्नबंधनात अडकले सिद्धार्थ-कियारा; अडवाणींची लेक झाली मल्होत्रांच्या घरची सून | siddharth malhotra and kiara advani got married | Loksatta

Siddharth Malhotra-Kiara Advani Wedding : शुभमंगल सावधान! लग्नबंधनात अडकले सिद्धार्थ-कियारा; अडवाणींची लेक झाली मल्होत्रांच्या घरची सून

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला.

siddharth and kiara

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. गेले अनेक महिने ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखेर हे दोघं विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. एएनआयने ट्विट करुन त्याबाबत अधिकृत माहितीही दिली आहे.

परवा यांच्या लग्नाची मेहंदी, काल हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर आज दुपारी ही दोघं लग्न बंधनात अडकली आहेत. लग्नाचे कोणतेही फोटो बाहेर जाणार नाहीत किंवा ते सोशल मीडियावर प्रसिद्ध होणार नाहीत याची काळजी सिद्धार्थ आणि कियारानं घेतली होती. त्यामुळे अद्याप या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत.

आणखी वाचा : Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्यात ‘या’ बॉलिवूड गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा व्हिडीओ

आज म्हणजेच ७ फेब्रुवारीला संध्याकाळी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचं लग्न झालं. ५,६ आणि ७ फेब्रुवारी यांचा लग्नसोहळा रंगला. ५ फेब्रुवारी रोजी मेहंदी, काल संध्याकाळी संगीत समारंभ संपन्न झाले. तर आज सकाळी यांचा हळदी समारंभ रंगला आणि अखेर आज दुपारी हे दोघं बोहल्यावर चढले. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आनंद घेता यावा यासाठी राजस्थानी नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडला.

हेही वाचा : Video: लग्नाआधीच कियारा अडवाणीचा ब्रायडल लूकमधील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

या लग्न सोहळ्यासाठी या पॅलेसमध्ये ८० खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १०० टे १५० पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थ-कियाराच्या हळदी आणि संगीत सोहळ्याचे व्हिडीओही व्हायरल झाले. यावेळी या पॅलेसला आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली होती. आता या या दोघांच्या लग्न झाल्याचं समोर येताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:10 IST
Next Story
“सुपरस्टार झाल्यानंतर नातं जपलं नाही आणि कुणालाही…” सलमान खानच्या वडिलांचा अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठा खुलासा