Sonali Bendre on link up Rumours with Co Actors: अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या चित्रपटांपासून दूर असली तरीही ओटीटीच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. तिचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. त्याबरोबरच अभिनेत्री सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
मी एकच चूक…
सोनाली बेंद्रेने नुकतीच ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सहकलाकारांबरोबर अनेकदा नाव जोडले जाते, तसेच बरोबरीच्या लोकांचा दबाव असतो, त्याला ती कशी सामोरी गेली, यावर वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या अनुभवांमधून शिकत गेले. मी त्याच चुका परत केल्या नाहीत. मी एकच चूक कधीच दुसऱ्यांदा केली नाही. एखाद्या गोष्टींतून मला धडा मिळाला आणि तशा गोष्टी कशा हाताळायच्या समजले की, मग पुढच्या वेळी त्या गोष्टी घडायच्या नाहीत.”
सोनाली कुलकर्णीने असेही सांगितले की, बालपणात मला अनेक शहरे, अनेक शाळा बदलाव्या लागल्या. त्यामुळे मी होणाऱ्या बदलांशी सहजपणे जुळवून घेऊ शकले. नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास शिकले. तसेच मी स्वत:ला स्वावलंबी बनवले. आसपासच्या लोकांच्या कौतुकाची गरज वाटली नाही. तसेच, दबावही जाणवला नाही.
सहकलाकारांबरोबर अनेकदा नाव जोडले जाते, त्यावर बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मला याची जाणीव झाली की, ही कधी कधी ती पत्रकाराची कल्पनाशक्ती असते. आजकाल ‘क्लिकबीट’बद्दल बोलले जाते. तो काळ हेडलाइन्सचा होता. हेडलाइनवरून पेपर विकले जायचे. पण, अनेकदा असेही होते की ,निर्मात्याला प्रसिद्धी हवी असते. किंवा कलाकारांना स्वत:बद्दल चांगले वाटून घ्यायचे असते. त्यामुळे अशा गोष्टींची चर्चा होता. अशा चर्चा होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामुळे कोणा एका व्यक्तीला दोष देता नाही. तो त्या त्या क्षेत्राचा भाग असतो, त्याचे परिणाम असतात. त्याच क्षेत्राने मला प्रसिद्धी, पैसा व काम दिले आहे.”
सोनाली बेंद्रे नुकतीच “बी हॅप्पी’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन, नोरा फतेही, इनायत वर्मा हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. प्राइम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवरील या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक झाले. आता ती लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तिच्याबरोबर अली फजल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.