सोनम कपूर ही फॅशन आयकॉन, फॅशन दिवा या नावांनी इंडस्ट्रीमध्ये प्रचलित आहे. अभिनयाबरोबरच ती आपल्या वेगवेगळ्या लूक्समुळे सतत चर्चेत असते. सोनमनं नुकतीच तिच्या बुक लॉंचला हजेरी लावली होती. या लॉंच सोहळ्याला सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तिच्या या लूकचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोनमच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिला ट्रोल केलं आहे. एकानं कमेंट करीत लिहिलं, “दारा सिंगसारखी दिसतेय.” तर, “ही नाईट ड्रेसवर का फिरतेय.” असं दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं. “हिचा ड्रेसिंग सेन्स कुठे गेला”, असंही एकानं विचारलं. “सोनमनं उशांची कव्हर्स घातली आहेत, असं वाटतंय. जर कोणती गोष्ट सध्या ट्रेंडमध्ये किंवा फॅशनमध्ये असली तरी ती प्रत्येकाला शोभून दिसेल असं नसतं”, असं एका नेटकऱ्यानं सांगितलं.

“बॉलीवूडमधली फ्लॉप अभिनेत्री” असं एका युजरने लिहिलं. “यापेक्षा वाईट ड्रेस मी आजपर्यंत बघितला नाही.”, “चालता फिरता हॅंगर”, “ती हॅंगरमधून ड्रेस काढायला विसरली” अशा प्रकारच्या ट्रोल्स करणाऱ्या कमेंट्स सोनम कपूरच्या व्हिडीओवर करण्यात आल्यात.

हेही वाचा… “मन म्हणतंय नाच गं घुमा…” लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितली चित्रपटाच्या नावामागची रंजक गोष्ट

सोनम कपूर ही बॉलीवूडची फॅशनिस्टा आहे हे सत्य नाकारता येणार नाही. पण, तिच्या गरोदरपणात आणि तिचा मुलगा वायू याच्या जन्मानंतरही सोनमची फॅशन चॉइस बदलली. प्रेग्नन्सीनंतर फॅशन चॉइस बदलल्याचं सांगत सोनम म्हणाली होती, “माझ्या मुलाच्या जन्मानंतर माझ्या वजनात मोठा फरक पडला होता. मला माझं वजन हळूहळू कमी करायचं होतं आणि स्वत:कडे आणि बाळाकडेही लक्ष द्यायचं होतं. म्हणून मी हळूहळू माझं वजन कमी केलं. माझ्या शरीरावर प्रेम केलं.”

हेही वाचा… करण कुंद्रा तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेता म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोनम कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘ब्लाईंड’ चित्रपटात सोनम कपूर प्रमुख भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला होता. २०२४ मध्ये सोनम चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.