scorecardresearch

लाडक्या राहाला पहिल्यांदा भेटण्यासाठी तैमूर आतुर; ‘या’ दिवशी होणार भावा-बहिणीची भेट

गेल्या महिन्याभरात एकाही बाहेरच्या व्यक्तीला राहाला भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

लाडक्या राहाला पहिल्यांदा भेटण्यासाठी तैमूर आतुर; ‘या’ दिवशी होणार भावा-बहिणीची भेट

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. ६ नोव्हेंबर रोजी आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या लेकीचे नाव ‘राहा’ ठेवलं असल्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं. राहा आता लवकरच एका महिन्याची होणार आहे. त्यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी एक गेट-टुगेदर आयोजित केलं आहे. यावेळी तैमूर पहिल्यांदाच राहायला भेटणार आहे.

राहाच्या जन्मापासूनच कपूर कुटुंबीय तिच्या तब्येतीची आणि तिच्या सुरक्षिततेची काळजी घेत आले आहेत. या गेल्या एका महिन्याच्या काळात एकाही बाहेरच्या व्यक्तीला राहाला भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त बाहेरची व्यक्तीच नव्हे तर कपूर परिवारातीलही अनेक जणांनी राहाला प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यातलाच एक म्हणजे तैमूर.

आणखी वाचा : Photos: मुलीच्या जन्मानंतर ‘अशी’ झाली आहे आलियाची अवस्था; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

‘झी न्यूज’च्या अहवालानुसार ६ डिसेंबर रोजी कपूर कुटुंबीयांनी राहाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसानिमित्त एक फॅमिली गेट-टुगेदर आयोजित केलं आहे. यावेळी सगळे कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी एकत्र येणार आहेत. राहाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवशी तैमूर पहिल्यांदाच राहाला भेटणार आहे.

हेही वाचा : ब्रँडेड ज्वेलरीपासून ते चॉकलेट्सपर्यंत, ‘कॉफी विथ करण’च्या महागड्या गिफ्ट हॅम्परमध्ये काय असतं? जाणून घ्या

तिच्या जन्मापासून तैमूर तिला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याला राहाला त्याच्या कडेवर घ्यायचं आहे. राहाचा जन्माची बातमी जेव्हा करीनाने तैमूरला सांगितली होती तेव्हा तो पुन्हा एकदा मोठा भाऊ झाला असल्याने खूप आनंदी झाला होता. महिनाभर त्याने राहला भेटण्यासाठी वाट पाहिली. पण आता अखेर भावा-बहिणींची पहिल्यांदा भेट होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 16:31 IST

संबंधित बातम्या