Urmila Matondkar Shared New Post : उर्मिला मातोंडकर ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ९० च्या काळात तिनं अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. सौंदर्य आणि सहज सुंदर अभिनय यांमुळे तिनं प्रेक्षकांना आपलंसं केलं. आता उर्मिला अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नसते. परंतु, अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करीत असते आणि सोशल मीडियावरही ती सक्रिय असते.

उर्मिलानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. उर्मिलानं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिनं गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीनं तिचे हे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी लाईक व कमेंट्सचा वर्षाव केला.

उर्मिलाच्या या फोटोंखाली अनेकांनी कमेंट करीत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं “तू खूप सुंदर दिसत आहेस. अगदी बार्बी डॉलसारखी”, असं म्हटलं आहे. दुसऱ्यानं, “चिरतरुण सौंदर्यामागचं रहस्य काय आहे”, अशी कमेंट केली आहे. परंतु, अभिनेत्रीच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी तिच्या चेहऱ्यामध्ये काहीतरी बदल जाणवत असल्याचं म्हटलं आहे.

उर्मिलाच्या पोस्टखाली एका नेटकऱ्यानं, “तू चेहऱ्यावर काहीतरी केलं आहेस वाटतं”. दुसऱ्यानं, “तू तुझ्या चेहऱ्यावर काही केलं आहेस का”, असं म्हटलं आहे. एका नेटकऱ्यानं “तू ओठांची किंवा चेहऱ्याची सर्जरी केली आहेस का? बेकार दिसत आहे”, अशी कमेंट केली आहे. उर्मिलानं शेअर केलेल्या तिच्या या फोटोंमध्ये अनेकांना तिच्या चेहऱ्यामध्ये बदल जाणवत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उर्मिला मातोंडकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘आग’, ‘जुदाई’, ‘कानून’, ‘अफलातून’, ‘दिवाने’, ‘खुबसुरत’, ‘जानम समजा करो’, ‘कुदरत’, ‘जंगल’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. तिनं शेवटचं दिवंगत अभिनेता इरफान खानच्या ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटात काम केलं होतं.