विकी कौशल काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. ‘तौबा तौबा’ गाण्यातील त्याच्या डान्समुळे चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सगळे जण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. सध्या विकी कौशल त्याच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. पण, यादरम्यान चर्चा मात्र कतरिना कैफची होताना दिसत आहे.

विकी कौशलने एका मुलाखतीदरम्यान कतरिनाला त्याच्या ‘तौबा तौबा’ गाण्याबद्दल काय वाटले याचा खुलासा केला. तो म्हणतो की, ज्यावेळी कतरिनाने हे गाणे चांगले झाले आहे, असे म्हटले त्यावेळी मला छान वाटले. हे गाणे पाहिल्यानंतर ती आनंदी होती. कारण- हे गाणे मी सहज केले. तिला गाणे आवडले यातच सगळे आले, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

तो म्हणतो, “कतरिनाने गाण्याला मान्यता देणे म्हणजेच तिला मी केलेला डान्स आवडणे. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. कारण- तिला वाटते की, मी प्रशिक्षित डान्सर नाही. त्यामुळे मी कधी कधी त्या गाण्याला न्याय देऊ शकत नाही.” याबद्दल अधिक बोलताना विकी कौशलने म्हटले आहे की, कतरिना मला नेहमी हे सांगत असते की, विकी मला माहीत आहे की, तुझे डान्सवर प्रेम आहे. पण, तू वरातीत डान्स करणारा आहेस; एक प्रशिक्षित डान्सर नाहीस आणि हे आपल्या खऱ्या आयुष्यात ठीक आहे. पुढे विकी म्हणतो की, पण मला कॅमेऱ्यासाठी माझा उत्साह टिकवून ठेवण्याची गरज आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”

‘तौबा तौबा’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे डान्सच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या हृतिक रोशननेदेखील विकीने ज्या प्रकारे गाण्याचे सादरीकरण केले आहे, त्याचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच बॉलीवूडच्या भाईजाननेदेखील विकीचे कौतुक करीत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. या दिग्गज अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर विकीला आनंद झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्याच्या या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील बनविल्या जात असून, प्रेक्षकांनादेखील विकीचे हे गाणे आवडल्याचे पाहायला मिळत आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलबरोबर तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अ‍ॅण्ड वॉर’ चित्रपटात विकी आपल्या अभिनयाची झलक दाखविताना दिसणार आहे. कतरिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘टायगर व्हर्सेस पठाण’ व ‘जी ले जरा’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.