विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. चित्रपटाचा ट्रेलर जिथपासून प्रदर्शित झाला तिथपासूनच ‘बॉयकॉट लायगर’ हा ट्रेंड सुरु झाला. पण चित्रपटावर याचा परिणाम होणार नाही असंही बोललं जात होतं. विजयचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. परंतु आता त्या धक्क्यातून सावरत विजयने आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात केल्या जाणाऱ्या तुलनेवर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…”

अलीकडे विजय देवरकोंडाने उरीमध्ये भारतीय सैन्यातील जवानांसोबत वेळ घालवला. यावेळी काढलेले काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे पाहून तो आगामी चित्रपटासाठी मेहनत घेत असल्याचे त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आले आहे. विजय देवरकोंडा नुकताच जम्मू-काश्मीरमधील उरीला पोहोचला. जिथे तो लष्कराच्या बेस कॅम्पवर पोहोचला. तेथील त्याचे काही फोटो त्याने आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये विजयच्या हातात बंदूक दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तो बंदूक चालवताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत त्याने सैन्यातील जवानांबरोबर पोज दिली आहे.

उरीमधील जवानांबरोबर बोलून विजय उभं राहून, जमिनीवर झोपून अशा विविध प्रकारे बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहे. विजयचे हे फोटो बघून तो आगामी चित्रपटाची जैय्यत तयारी करत असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

हेही वाचा : तेलंही गेलं, तूपही गेलं अन्…, ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशामुळे अनन्या पांडेच्या करिअरवर परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय देवरकोंडाचा ‘जन गण मन’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पुरी जगन्नाथ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाच्या तयारीसाठीच तो उरीला पोहोचल्याचे बोलले जात आहे. नंतर लगेचच विजय देवरकोंडा समांथा रुथ प्रभूबरोबर ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.