अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचा बहुचर्चित चित्रपट ‘गहराइयां’ ११ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण व्यतिरिक्त अनन्या पांडे, धैर्य कारवा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटासोबतच त्यातील सुंदर लोकेशन्सची देखील तेवढीच चर्चा होताना दिसते. विशेषतः चित्रपटात दाखवण्यात आलेला सी-साइड अलिबाग व्हिला. ज्यात चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा धम्माल करताना दिसतात.

‘गहराइयां’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या या सुंदर व्हिलाची संपूर्ण कथेत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं पाहायला मिळतं. चित्रपटात हा व्हिला जरी अलिबागमध्ये असल्याचं दाखवण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र हे लोकेशन गोव्यात आहे. हा व्हिला म्हणजे गोव्यातील एक हॉटेल आहे. ज्याचं नाव आहे ‘हॉटेल अहिल्या’. या सी-साइड व्हिला हॉटेलमध्ये जवळपास ९ खोल्या आहेत. याशिवाय दोन स्विमिंग पूल, गार्डन आणि स्पा एरिया आहे. गोव्यातील या सी- साइड हॉटेलचं एका रात्रीचं भाडं देखील तेवढंच तगडं आहे.

गोवा स्थित या सी-साइड हॉटेलचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ‘गहराइयां’ चित्रपटाचं शूटिंग झालेल्या या व्हिला हॉटेलमधील एका खोलीचं एका रात्रीचं भाडं २१ हजार ते ३३ हजार एवढं आहे. हे ठिकाण अत्यंत रम्य आणि शांत अशा जागी आहे. तसेच सी-साइड असल्यानं इथून डॉल्फिन दर्शनही होतं. या संपूर्ण प्रॉपर्टीमध्ये एकूण ३ व्हिला आहेत आणि प्रत्येक व्हिलामध्ये ३ खोल्या आहेत. यापैकी दोन व्हिलाच्या बाजूला स्विमिंग पूल आहे.

View this post on Instagram

A post shared by Ahilya by the Sea (@ahilyabythesea)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या ‘गहराइयां’ चित्रपटाबाबत बोलायचं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्राचं आहे. तर निर्मिती करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’नं केली आहे. दीपिका पदुकोण, धैर्य कारवा, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतच या चित्रपटात रजत कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.