‘या’ ऑलिम्पिक खेळाडूसोबत दीपिका पदूकोण बॅडमिंटन कोर्टमध्ये गाळतेय घाम; रणवीर सिंहने केली ‘ही’ कमेंट

दीपिकाचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

deepika-padukone
(Photo-Instagram@deepikapadukone)

अभिनेत्री दीपिका पदूकोण एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय दीपिकाला बॅडमिंटन खेळण्याची देखील मोठी आवड आहे. दीपिका जेव्हा शूटिंगमध्ये व्यस्त नसते तेव्हा अनेकदा ती वर्कआउट किंवा बॅडमिंटन खेळण्यास पसंती देते. नुकतेच दीपिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात दीपिका बॅडमिंटन कोर्टमध्ये घाम गाळताना दिसून य़ेत आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ती बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूसोबत बॅडमिंटन खेळताना दिसून येतेय. दीपिकाचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दीपिका कॅप्शनमध्ये म्हणाली, “माझ्या आयुष्यातील फक्त एक साधारण दिवस, पी.व्ही सिंधूसोबत कॅलरीज बर्न करत आहे.”


दीपिकाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एक युजर म्हणाला, ” पीव्ही सिंधूची बायोपिक करत आहेस का?”तर दीपिकाच्या पोस्टवर पती रणवीर सिंहने केलेल्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “खूप मोठा फोमो अटॅक” अशी कमेटं रणवीरने केलीय.

रणवीर लवकरच ’83’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात रणवीरसोबत दीपिकादेखल मुख्य भूमिकेत झळकेल. तर दीपिका ‘फायटर’, ‘पठाण’, ‘द इंटर्न’ अशा अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deepika padukone plays badminton with pv sindhu ranveer singh comment kpw