एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी ‘मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे’ या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही कीर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ही गुरू शिष्याची जोडी. आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट.

ठाण्याचा ढाण्या वाघ असलेले जननायक धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. नुकतंच या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि केवळ २० तासांमध्ये या गाण्याला २० लाखांहून अधिक प्रेक्षक वर्ग लाभला असून हजारो लोकांनी हे गाणं शेअरही केलं आहे. युट्यूबवर सुद्धा हे गाणे नंबर १ ला ट्रेडिंगमध्ये आहे हे विशेष.

Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण

आणखी वाचा- तारक मेहताच्या टीमने मागितली जाहीर माफी, लता मंगेशकर यांच्याबाबत झाली होती मोठी चूक

धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द. अशा या गुरुची पाद्यपूजा करत या नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आलाय. हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा- Bhool Bhulaiyaa 2 Trailer : हॉरर आणि कॉमेडीचा तडका, कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैय्या’ २ चा ट्रेलर पाहिलात का?

शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले. जसं हे गुरू शिष्याचं नातं सर्वश्रुत आहे तसाच निर्मळ आणि निरपेक्ष भाव आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरू-शिष्याच्या नात्यात. याही नात्याची एक झलक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळाली. या गाण्यामुळे आता चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. येत्या १३ मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.