Dilip Kumar Health Update : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा

सध्या ते ऑक्सिजन सपोर्टवर आहेत

dilip kumar, dilip kumar health updates, dilip kumar wife, dilip kumar health, saira banu,
त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते.

श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे रविवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर सध्या उपचार करीत आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल असे म्हटले जात आहे.

हिंदुजा रुग्णालयतील डॉ. जलील पारकर यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. पण सध्या ते ऑक्सिजन सपोर्टवर आहेत अशी माहिती पारकर यांनी दिली आहे.

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काल ट्वीट करत सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

आणखी वाचा : सायरा बानो यांनी शेअर केला दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो

करोनाची लागण झाल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. ही बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगितले. मात्र, दिलीप कुमार यांचे नेहमीच काही रूटिन चेकअप होत असतात. तर, याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dilip kumar health update he is stable now saira banu avb

Next Story
पं. मनोहर चिमोटे
ताज्या बातम्या