scorecardresearch

ताजिकिस्तानचा ‘हा’ छोटा गायक बनला बिग बॉस १६ मधला पहिला स्पर्धक; खुद्द सलमान खानने केली घोषणा

शनिवारी १ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस १६’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

ताजिकिस्तानचा ‘हा’ छोटा गायक बनला बिग बॉस १६ मधला पहिला स्पर्धक; खुद्द सलमान खानने केली घोषणा
तो सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

‘बिग बॉस’ हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाने टीआरपीच्या स्पर्धेमध्ये बरेच नवे उच्चांक गाठले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. पण येणाऱ्या नव्या पर्वामध्ये तो अन्य स्पर्धकांसह बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार आहे. दरम्यान या रिअ‍ॅलिटी शो संबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

नुकतीच या कार्यक्रमाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये सलमान खानने सोळाव्या पर्वातील पहिल्या सदस्याची ओळख करुन दिली. या स्पर्धकाचे नाव ‘अब्दू रोजिक’ असे आहे. तो मुळचा ताजिकिस्तान आहे. अठरा वर्षांचा अब्दू गायक आहे. त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. त्याने गायलेल्या हिंदी गाण्यांनाही नेटकऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. तो सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

आणखी वाचा – “नक्कीच मला…” शिवाली परबने दिले ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल स्पष्टीकरण

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्याने सलमान खानसह काम करण्याचा अनुभव सांगितला. “बिग बॉसच्या घरात जायला मी फार उत्सुक आहे. मी लहानपणापासून सलमानचे चित्रपट पाहत आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये मी त्याला भेटलो. तेव्हा आम्ही गप्पाही मारल्या. त्याच्या आगामी चित्रपटामध्ये मी छोटीशी व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला मोठ्या भाईजानसह हा छोटा भाईजानसुद्धा पाहायला मिळणार आहे”, असे त्याने म्हटले आहे. शिवाय त्याने दिलेल्या संधीबद्दल सलमानचे आभार मानत ‘तो मोठ्या मनाचा आहे’ असेही म्हटले आहे.

आणखी वाचा – अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

अब्दू रोजिक व्यतिरिक्त बिग बॉसच्या नव्या पर्वामध्ये टीना दत्ता, गौतम विग, शालिन भानोत, मन्या सिंग, सौंदर्या शर्मा असे कलाकार सहभागी होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी १ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस १६’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या