प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. केकेच्या निधनानंत संपूर्ण कलाविश्वालाच धक्का बसला आहे. तर दुसरीकडे ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेलं आहे. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यानचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने यावर आपलं मत मांडलं आहे. तसेच गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.
अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री मानुषी छिल्लरसह वाराणसी इथे पोहोचला. यावेळी त्याने गंगाआरती देखील केली. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अक्षयने देवदर्शन केलं आहे. यादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. केकेच्या निधनाची बातमी ऐकताच सगळ्यांना दुःखद धक्का बसला. केकेने अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याचबरोबरीने अभिनेता इमरान हाश्मीसाठी त्याने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली.
केकेंना आवडायची त्यांनी गायलेली 'ही' पाच गाणी
प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके यांचं काल (३१ मे) कोलकात्यामध्ये निधन झालं. त्यांनी जवळपास ५०० हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. केके यांच्या गाण्यांचे लाखो चाहते आहेत.
हिंदी मालिकांमुळे नावारुपाला आलेला अभिनेता करण ग्रोवर विवाहबंधनात अडकला आहे. करणने अभिनेत्री पॉपी जब्बलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. मंगळवारी ३१ मे रोजी करण-पॉपीचा विवाहसोहळा पार पडला. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या अकाली एक्झिटमुळे फक्त संगीत क्षेत्रच नाही तर संपूर्ण बॉलिवूडलाच मोठा धक्का बसला आहे. एकीकडे संपूर्ण इंडस्ट्री यावर दुःख व्यक्त करत असतानाच अभिनेता इमरान हाश्मीनं देखील केके यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया दिली आहे. केके यांना इमरान हाश्मीचा आवाज मानलं जात असे.
Photos : जेव्हा केके यांनी अर्ध्यावरच सोडलं होतं गाणं…; मुलाखतीदरम्यान सांगितला होता किस्सा
प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके यांचं काल (३१ मे) कोलकात्यामध्ये निधन झालं. आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या केके यांना गाण्याचे बोल अर्धवट वाटल्यामुळे ते गाणं अर्ध्यावरच सोडून निघून गेले होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा किस्सा सांगितला होता.
फोटो पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अभिनेता बॉबी देओलची सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज ‘आश्रम’चा तिसरा भाग येत्या ३ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आश्रम’ वेब सीरिजमध्ये बॉबी देओल खलनायकी भूमिकेत दिसला असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो खूपच शांत आणि रोमँटीक आहे.
प्राथमिक माहितीनुसार ५३ वर्षीय केके यांचं निधन कार्डियक अरेस्टमुळे झाल्याचं बोललं जातंय. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान पुढच्या काही तासांमध्ये हा गायक अशाप्रकारे जगाचा निरोप घेईल असं कोणाला वाटलंही नव्हतं. पण अखेरच्या काही क्षणांमध्ये काय घडलं याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
केके उर्फ कृष्ण कुमार कन्नथ हे बॉलिवूड इंस्ट्रीत मोठं व्यक्तिमत्त्व मानले जात होते. संगीताचं शिक्षण घेतलेलं नसतानाही आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी बरीच हीट गाणी गायली आणि त्यातून प्रसिद्धी देखील मिळवली. पण केके यांनी त्यांचं खासगी आयुष्य मात्र या प्रसिद्धीपासून नेहमीच दूर ठेवलं. फार कमी लोकांना माहीत आहे की केके यांनी त्यांच्या बालमैत्रिणीशी लग्न केलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव ज्योती आहे. केके आणि ज्योती यांना दोन मुलं आहेत.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’ यांचे काल (३१ मे) रोजी निधन झाले आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जाहिरातीतील जिंगल्स ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हा केके यांचा प्रवास खूप मोहून टाकणारा आहे.
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांचे लाखो चाहते आहेत. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, अभिषेक, आप्पा, कांचन हे सर्व कलाकार घराघरात प्रसिद्ध आहे.
सुप्रसिद्ध गायक केकेने अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. संगीत क्षेत्रात त्याचं योगदान मोठं आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल केकेने कधीच गाण्याचं प्रशिक्षण घेतलं नाही. सुरुवातीपासूनच तो गाणं शिकला नाही. कृष्णकुमार कुन्नथ हे त्याचं पूर्ण नाव. पण आजही त्याला केके या नावाने ओळखतात.
ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेलं आहे. वाराणसीतील न्यायालयाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झालं. या सर्वेदरम्यानचे व्हिडीओ ३० मे २०२२ रोजी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना सोपवण्यात आले. हे प्रकरण ताजं असतानाच अभिनेता अक्षय कुमारने याबाबत आपलं मत मांडलं आहे.
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. केकेच्या निधनानंतर मात्र अभिनेता गायक इम्रान हाश्मी ट्विटरवर ट्रेंड होत आहे.