अखेर एकमेकांसमोर येणार सलमान – ऐश्वर्या

चाहते सलमान – ऐश्वर्याला चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सलमान खान, ऐश्वर्या राय

बॉलिवूडमध्ये एकेकाळी गाजलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन. आताच्या घडीला हे दोन्ही कलाकार एकमेकांच्या समोरही येत नाहीत. पण आजही त्यांचे चाहते सलमान – ऐश्वर्याला चित्रपटात एकत्र काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. मात्र, हे दोघं लवकरच बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर येणार हे नक्की झालंय.

VIDEO : दीपिकाच्या ‘घुमर’वर थिरकल्या बेयॉन्से आणि शकिरा

दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा एक तरी चित्रपट प्रदर्शित होतोच. पुढच्या वर्षीही ईदला त्याचा ‘रेस ३’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्यासोबत इरफान खान आणि राजकुमार राव यांच्या भूमिका असलेला ‘फन्ने खान’ चित्रपटदेखील त्याचवेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याने ‘मिड डे’ वृत्तपत्राला याबाबतची माहिती दिली. ‘फन्ने खान’च्या प्रदर्शनासाठी आम्ही ईदची तारीख (१५ जून) ठरवली आहे. ‘फन्ने खान’ ही मुस्लिम व्यक्तिरेखा अनिल कपूर साकारतोय. त्यामुळे त्याच्या भूमिकेचा विचार करता ईदशिवाय दुसरा कोणताच योग्य दिवस असूच शकत नाही.’

सलमान आणि ऐश्वर्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी बातमी असेल यात शंका नाही. कारण, दोघांपैकी कोणाचा चित्रपट पाहावा, असा प्रश्न त्यांच्या मनात आल्यावाचून राहणार नाही. दोघंही बॉलिवूडमधील मोठे कलाकार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवरील त्यांची टक्कर चित्रपटांच्या कमाईवर परिणाम करू शकते.

TOP 10 NEWS : आर्चीच्या ‘त्या’ व्हिडिओपासून अनुष्काच्या क्रशपर्यंत..

व्यापार विश्लेषकांच्या मते, सलमान – ऐश्वर्यामधील नाते आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांची टक्कर पाहणे औत्सुक्याचे राहिल. एकीकडे आजवर सलमानला बॉक्स ऑफिसवर नेहमी घवघवीत यश मिळत आलेय. तर दुसरीकडे, ऐश्वर्या आणि अनिल कपूर यांच्याही चाहत्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे त्याचा चित्रपटाला फायदा होऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ex lovers aishwarya rai and salman khan all set to clash at the box office on eid

ताज्या बातम्या