देवाचं अस्तित्व खरंच आहे की नाही, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय, आस्तिक असणं योग्य आहे की नाही, समाजामध्ये सुरु असलेल्या या द्वंद्वावर भाष्य करणारी झी युवा या वाहिनीवरील ‘देवाशपथ’ ही मालिका. गुढीपाडव्यानिमित्त या मालिकेच्या कथेत नेमके कोणते वळण येणार आहे, श्लोक आणि कुहूच्या नात्याला एक नवीन दिशा मिळेल का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळावीत यासाठी गुढीपाडव्यानिमित्त महाएपिसोड प्रसारित होणार आहे.
कुहू (कौमुदी वलोकर) आपल्या बाबांना श्लोकबद्दल सांगावं की नाही या संभ्रमात आहे. कुहूच्या बाबांना श्लोक अजिबात आवडत नाही पण श्लोकशिवाय ती राहू पण शकत नाहीये. ज्या नारळावरून श्लोकच्या भविष्याची दिशा ठरणार आहे ते अण्णा महाराजांनी श्लोकच्या घरात ठेवलेलं आहे, जे गुढीपाडव्याच्या दिवशी फोडलं जाणार आहे. हे नारळ फोडताना कुहू तिथे असायला हवी असं अण्णा महाराजांनी श्लोकच्या वडिलांना सांगितल्यामुळे कुहू गुढीपाडव्याच्या दिवशी दशपुत्रेंच्या घरी जाणार आहे.
वाचा : ‘फुलपाखरू’मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस आणि वैदेहीची एक नवीन सुरुवात
नेमकं काय होईल गुढीपाडव्याच्या दिवशी? अण्णा महाराज आणि नारायण यांची भेट होईल का? जर खरंच घरात असलेलं नारळ श्लोकच्या भविष्याची दिशा ठरवणार असेल तर श्लोकला त्याची प्रचिती येईल का? गुढीपाडव्याच्या निमित्तावर कुहू तिच्या जोडीदाराबद्दल तिच्या बाबांना खरं काय ते सांगू शकेल का? कुहूची श्लोकच्या भविष्याबद्दलची काळजी अण्णा महाराज मिटवू शकतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा गुढीपाडव्यानिमित्त ‘देवाशपथ’ या मालिकेचा महाएपिसोड. येत्या रविवारी म्हणजेच १८ मार्च रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.