गेल्या काही महिन्यांपासून ऑस्कर पुरस्कारांबद्दल चर्चा सुरु आहे. राजामौली यांचा आरआरआर आणि ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने बाजी मारली आहे. ऑस्करसाठी भारताकडून द काश्मीर फाईल्स’, ‘आरआरआर’, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’हे चित्रपट पाठवणार अशी चर्चा होती मात्र ऑस्करकडून आरआरआर आणि ‘छेल्लो शो’ या दोन चित्रपटांना शॉर्टलिस्ट केलं गेलं आहे.

ऑस्कर पुरस्कार हे चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. जगभरातील चित्रपट निर्माते या पुरस्कारासाठी आपले चित्रपट पाठवत असतात. यंदा ‘छेल्लो शो’ या चित्रपटाला हा मान मिळाला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ‘छेल्लो शो’चा इंग्रजी अनुवाद ‘द लास्ट शो’ असा आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म या कॅटेगरीसाठी चित्रपटाला शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

…आणि दुबईच्या मॉलमध्ये ‘पप्पी दे पारुला’ गाणे वाजले; स्मिता गोंदकरने शेअर केली fan moment

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांनी केले आहे. त्यांच्या ‘संसारा’, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ आणि ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातमधील सौराष्ट्र या भागातल्या एका खेड्यातली ही गोष्ट आहे. या खेड्यामध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते.सिद्धार्थ रॉय कपूर, धीर मोमाया आणि पॅन नलिन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ९५ वा अकादमी पुरस्कार सोहळा १२ मार्च २०२३ रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहरात संपन्न होणार आहे.