scorecardresearch

“तो माझा…”, सलमानचा भाऊ सोहेल खानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर हुमा कुरैशीने केले होते वक्तव्य

लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेल खान आणि सीमा खानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

huma qureshi, Sohail Khan,
लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेल खान आणि सीमा खानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोहेल खान आणि सीमा खान एकमेकांपासून वेगळे होणार, याविषयी ‘फेब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये कळले होते, ज्यामध्ये सीमा दिसली होती. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचे एक जुने वक्तव्य या जोडप्याचे विभक्त होण्याच्या बातम्यांदरम्यान चर्चेत आले आहे. यावेळी सोहेल आणि तिच्या विषयी सुरु असलेल्या अफवांवर तिने वक्तव्य केले होते.

काही काळापूर्वी हुमा सोहेल खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सोहेल-हुमामधील वाढत्या जवळिकीमुळे सोहेलची पत्नी सीमा खानला खूप त्रास झाल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले जात होते. रिपोर्टनुसार, हुमाने या ट्रोल करणाऱ्या लोकांवर संतप्त होऊन एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये हुमा म्हणाली की, “तुम्ही सर्वांची माफी मागावी. तुमच्यात एथिक्स नाही, मौरॅलिटी नाही आणि कलाकारांनी तुमच्यासारख्या मूर्खांकडे दुर्लक्ष केल्यामुळे. तुम्हाला वाटते की आम्ही तुम्हाला घाबरलो आहोत? अजिबात नाही.”

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान सोहेल आणि सीमाने हुमाकडे दुर्लक्ष केल्याच्या बातम्या आल्या तेव्हा हे सगळं समोर आलं होतं. यानंतर एकदा हुमा आणि सीमा यांच्याच वाद होऊ लागले होते. त्यानंतर हुमाने या सर्व अफवा फेटाळून लावत सोशल मीडियाच्या माध्यमातून सोहेल हा तिच्या भावासारखा आहे असे म्हणतं सगळ्या अफवा खोट्या आहेत असे सांगितले होते.

आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

सोहेल खान आणि सीमा खान १९९८ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. २०१७ मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती. ‘द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात आणि मुलं दोघांसोबत राहतात असं दाखवण्यात आलं होतं. सीमा आणि सोहेल वेगळे राहतात हे या शोमधून स्पष्ट झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Huma qureshi was reacted on rumours of relationship with sohail khan dcp

ताज्या बातम्या