टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ (Into The Wild With Bear Grylls). या शो च्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक फार आतुरतेने वाट बघत असतात. डिस्कव्हरी चॅनेलवर हा शो सर्वाधिक पाहिला जाणाऱ्या शो पैकी एक आहे. आतापर्यंत या शो मध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सहभाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण या शोमध्ये झळाकणार असल्याची माहिती समोर आली होती. आता या यादीत बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही समावेश होणार आहे. नुकतंच विकी कौशलने हा एपिसोड कधी प्रदर्शित होणार याची तारीख सांगितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल हा त्याच्या विविध चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटातील अभिनयामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यानंतर आता विकी कौशल हा ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ या कार्यक्रमात झळकणार आहे. नुकतंच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

विकीने दिलेल्या माहितीनुसार, “कठीण परिस्थित कसे जगायचे याचा तज्ज्ञ असलेला बिअर ग्रिल्स सोबत साहसी धाडस करण्यासाठी मी सज्ज आहे. त्याने माझ्यासाठी काय योजना आखून ठेवल्या आहे, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’हा भाग येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल,” अशी माहिती विकीने दिली आहे. त्यामुळे आता विकीचे चाहते खुप आतुरतेने या भागाची वाट बघत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ या, डिस्कव्हरी चॅनलवरील सुपर हिट शो मध्ये सेलिब्रेटी कठीण परिस्थिती कसे जगायचे हे या शो मध्ये पाहायला मिळतं. या शोच्या मागच्या सिझनमध्ये अभिनेता अक्षय कुमार, सुपर स्टार रजनीकांत आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीही २०१९ मध्ये या कार्यक्रमात दिसले होते. या शोचा नवीन सिझन तुम्ही डिस्कव्हरी प्लस अॅपवर प्रदर्शित होणार आहे.