scorecardresearch

मुलगा की मुलगी? सोशल मीडियावर होतेय प्रियांका चोप्राच्या बाळाची चर्चा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली असून सोशल मीडियावर तिच्या बाळाची जोरदार चर्चा सुरू आहे.

priyanka chopra, nick jonas, priyanka chopra become mother, priyanka chopra baby, priyanka chopra instagram, priyanka chopra age, प्रियांका चोप्रा, निक जोनस, प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम, प्रियांका चोप्रा झाली आई, प्रियांका चोप्रा सरोगसी, प्रियांका चोप्रा वय
प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानं नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आई झाल्याची बातमी दिली आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. मात्र सध्या त्यांच्या बाळाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रियांकानं आपल्या बाळाचं स्वागत करत असल्याचं तर तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. पण ते मुलगा आहे की मुलगी हे मात्र तिनं सांगितलेलं नाही. त्यामुळे याबाबत जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वांसोबत शेअर केली. तिनं लिहिलं, ‘आम्ही सरोगसीद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ आपल्या या पोस्टमध्ये तिनं निक जोनसला टॅग केलं आहे. पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही.

प्रियांकाच्या बाळाबद्दल सोशल मीडियावर उलट- सुलट चर्चा सुरू असतानाच एका अमेरिकन मासिकानं मात्र निक आणि प्रियांकानं सरोगसीच्या माध्यमातून मुलीला जन्म दिल्याचं म्हटलं आहे. पण प्रियांका आणि निक जोनस यांनी मात्र अद्याप यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही किंवा या वृत्ताला पुष्टी दिलेली नाही. त्यामुळे यात कितपत तथ्य आहे हे आगामी काळातच कळू शकेल.

दरम्यान प्रियांकाच्या सोशल मीडिया पोस्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रेटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. केविन जोनस, जो जोनस, सोफी टर्नर, लारा दत्ता, शेफाली शाह, भूमि पेडणेकर यांच्यासह इतर अनेक कलाकारांनी प्रियांकाच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केल्या आहेत. प्रियांका आणि निकचं हे पहिलंच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is priyanka chopra and nick jonas welcome baby girl via surrogacy know the details mrj

ताज्या बातम्या