Video: जया बच्चन रॉक्स! ‘पल्लो लटके’ गाण्यावर श्वेता बच्चनसोबत केला डान्स

हा जुना व्हिडीओ सध्या पुन्हा चर्चेत आहे.

अभिनेत्री जया बच्चन सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीपासून लांब असल्या तरी राजकारणामध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्या इंडस्ट्रीमधील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. तसेच नात नव्या नवेली नंदा जया यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक जुना डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर संदीप खोसलाच्या कुटुंबातील एका रिसेप्शन पार्टीमधील आहे. संदीपची भाची सौदामिनी हिचे लग्न २०१८मध्ये झाले होते. त्यावेळी रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान जया बच्चन यांनी मुलगी श्वेता सोबत ‘पल्लो लटके’ गाण्यावर डान्स केला होता. आता त्यांचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.

व्हिडीओमध्ये जया बच्चन सुरुवातील डान्स करण्यास नकार देतात. पण नंतर सर्वजण त्यांना डान्स करण्यास सांगतात. जया बच्चन आणि श्वेताचा हा डान्स पाहाता पार्टीला उपस्थित असलेले लोकं आनंदी झाल्याचे दिसत आहे.

नोराचा सेक्सी डान्सपाहून आईने फेकून मारली चप्पल, व्हिडीओ पुन्हा चर्चेत

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कोरिओग्राफर राजेंद्र सिंहने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘अमिताभ बच्चन यांची मुलगी आणि पत्नी जया बच्चन यांच्यासोबत डान्स केला’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jaya bachchan dance on pallo latke video viral avb

ताज्या बातम्या