करोनाची दुसरी लाट आल्यापासून भारतीय नागरिकांना धक्काच बसला आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, सोशल मीडियावरुन अनेक जण करोनाची औषधं, कोणत्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध आहेत आणि इतर गोष्टींची माहिती देत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सोशल मीडियाचा वापर करत सगळ्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. जॉनने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट हे स्वयंसेवी संस्थांच्या हाती सोपविले आहे. जेणेकरून करोनाच्या काळात ज्या लोकांना अशा गोष्टींची गरज आहे. त्यांना वस्तू मिळण्यास मदत होईल. यासंबंधीत एक पोस्ट जॉनने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. “एक देश म्हणून आपण अतिशय भीषण परिस्थितीचा अनुभव घेत आहोत. प्रत्येक मिनिटाला ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि लस आणि कधी अन्न न मिळणाऱ्या लोकांची संख्या ही वाढताना दिसत आहे. तर, अशा कठीण परिस्थितीत अनेक लोक एकत्र येऊन, एकमेकांना मदत करत आहेत, गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,” असे जॉन म्हणाला.
View this post on Instagram
जॉन पुढे म्हणाला, “आजपासून माझं सोशल मीडिया हे स्वयंसेवी संस्था वापरतील. देशभरातील इतर अनेक संस्था एकत्र येऊन काम करत आहेत. माझ्या अकाऊंटवरून केलेल्या पोस्ट या लोकांना लागणाऱ्या वस्तू त्यांना कुठे मिळतील हे सांगण्यासाठी असतील. या संकटावर मात करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पुढे येण्याची ही वेळ आहे. जीव वाचवण्यासाठी आणि ही लढाई जिंकण्यासाठी आपण एकत्र असणं गरजेच आहे. त्यासाठी घरीच राहा, सुरक्षित रहा. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि देशासाठी जबाबदार रहा,” अशा आशायाची पोस्ट जॉनने केली आहे.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २७ एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.