देओल फॅमिलीतील काका-पुतण्याची जोडी पहिल्यांदाच झळकणार; करण देओलने सेटवरचा फोटो केला शेअर

देओल फॅमिलीच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलने आपल्या आजोबांसोबत स्क्रीन शेअर केल्यानंतर आता काकासोबत एकत्र झळकणार आहे.

karan-deol-with-abhay-deol

सनी दओल आणि संपूर्ण देओल फॅमिलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलने २०१९ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर आता त्याने त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलंय. विशेष म्हणजे या चित्रपटात देओल फॅमिलीतील काका-पुतण्याची जोडी झळकणार आहे. करण देओलसोबत त्याचा काका अभय देओल मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. करण देओल आणि काका अभय देओल या दोघांनी त्यांच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलंय. नुकतंच त्यांनी आपल्या शूटिंग सेटवरचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केलाय.

करण देओल हा त्याचा काका अभय देओलला प्रेमाने ‘डिंपी चाचू’ नावाने हाक मारतो. करण देओलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काका अभय देओलसोबतचा हा फोटो शेअर केलाय. या फोटो शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “काका…नेहमीच माझ्याशी पाठी उभे राहत आलात त्यासाठी धन्यवाद. तुम्ही कायम मला प्रेरणा दिली आहे आणि आता तुमच्याचसोबत काम करण्याची संधी मिळाली. याचा आनंद मी कायम साजरा करणार आहे. खूप सारं प्रेम.” यापुढे लिहिताना करण देओल म्हणाला, “आम्ही एकत्र काय शूट करतोय हे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी खूपच उत्साहित आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

करण देओल सध्या खूपच आनंदात आहे. कारण बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणची निर्मिती आणि देवेन मुंजाल दिग्दर्शित ‘वेले’ चित्रपटासाठी त्याची निवड करण्यात आलीय. या चित्रपटात त्याचा काका अभय देओल सुद्धा त्याच्यासोबत झळकणार आहे. ‘वेले’ हा चित्रपट तेलुगु क्राइम कॉमेडी ‘ब्रोचेवरेवरुरा’चा हिंदी रिमेक आहे. रॉकी, रॅम्बो आणि राहुल या तीन मित्रांची मजेदार कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रूपेरी पडद्यापासून दूर राहिलेला अभय देओल आपल्या खास अंदाजात पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे.

करण देओलने यापूर्वी आपले आजोबा, वडील आणि काका बॉबी देओलसोबत स्क्रीन शेअर केली आहे. पण आता तो आपले ‘डिंपी चाचू’ अभय देओलसोबत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. करणने सनी देओल दिग्दर्शित ‘पल-पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘अपने २’ मधील बाप-लेकांच्या जोडीनंतर आता काका-पुतण्यांची जोडी एकत्र चित्रपटात दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karan deol with abhay deol will be seen in ajay devgans film wali prp