अभिनेत्री करीना कपूर खानचा मुलगा तैमूर हा कायमच चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. करीनाही आपल्या मुलाचे फोटो कायम शेअर करत असते. आताही करीनाने तिचा मुलगा तैमूर आणि पती सैफ अली खानचा एक फोटो शेअर केला आहे.

या नव्या फोटोमध्ये तैमूर आणि सैफ हे दोघे शेतात काम करताना दिसत आहेत. आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्त तिने हे फोटो शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोत तैमूर एका झाडावर बसलेला दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “भरपूर झाडे लावा. या जागतिक वसुंधरा दिनी झाडे वाचवा, लावा आणि वाढवा”.
या फोटोंना फारच कमी वेळात भरपूर लाईक्स मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सही केल्या आहेत.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, तैमूरच्या मालकीची एक मोठी बाग आहे. या बागेचा आकार १००० चौरस फुट एवढा आहे. या बागेत १०० झाडे आहेत. या बागेच्या प्रवेशद्वारावर तैमूर अली खान पतौडी फॉरेस्ट अशी पाटीही आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीनाची न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने तैमूरच्या पहिल्या वाढदिवसादिवशी त्याला ही बाग भेट दिली आहे. या बागेत १०० वेगवेगळी झाडे आहेत. ३ जांभळाची झाडे, १ फणसाचे झाडं, १ आवळ्याच झाडं, ४० केळीची झाडे, १४ शेवग्याची झाडे, १ कोकमचं झाडं, १ पपईच झाडं, ५ सीताफळाची झाडे, २ रामफळाची झाडे, २ लिंबाची झाडं आहेत. फळांसोबत ३ वेगवेगळ्या डाळी लावण्यात आल्या आहेत. तर मिर्ची, आलं, हळदं आणि कडीपत्याची देखील झाडं आहेत. फुलांमध्ये झेंडुच्या फुलांची छोटी बाग करण्यात आली आहे. पालेभाज्या देखील लावण्यात आल्या आहेत