अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्याचसोबत गेल्या काही दिवसांपासून करीनाला तैमूरसोबतच तसंच दुसरा मुलगा जेहसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आलंय. करीनाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल देखील होत आहे. नुकताच करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र व्हिडीओतील करीनाचं वागणं पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलंय.
या व्हायरल व्हिडीओत करीना तिच्या घरातून बाहेर पडताना दिसत आहे. करीनाच्या हातात एक कॉफी मग आहे. करीनाने योगा शॉर्टस् आणि डेनिम शर्ट परिधान केलंय. यावेळी कारकडे जात असताना सेक्यूरिटी गार्ड करिनाला सलाम ठोकताना दिसत आहे. मात्र करीनाने या गार्डकडे पूर्ण दूर्लक्ष केलं आणि ती पुढे गेली. करीनाचं हे वागणं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ सिनेमातील गाण्यात परिधान केलं होतं ‘या’ अभिनेत्याचं बनियान
करीनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिला ‘गर्विष्ठ’ म्हणत ट्रोल केलंय. “करीनाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे. की सेल्यूट करणाऱ्या गार्डकडेही तिने दूर्लक्ष केलं” असं एक युजर म्हणाला. तर दुसरा युजर म्हणाला, “मनी एटीट्यूडवाली आंटी” एक नेटकरी म्हणालाया, “म्हातारी झाली तरी संस्कार नाही”

तर आणखी एक युजर म्हणाला, “यांना कोणत्या गोष्टीचा गर्व आहे. हवेत बघत चाललीय. नाकावर मातीसुद्धा बसू देत नाहीय.”
अनेक नेटकऱ्यांनी करीनाच्या या वागण्यावर संताप व्यक्त केलाय. ट्रोल होण्याची करीनाची ही पहिली वेळ नव्हे. अगदी सैफसोबतच्या रिलेशनशीपपासून ते दोन्ही मुलांच्या नावांपर्यंत करीनाला वेळोवेळी नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.