बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या पहिल्या प्रेयसीमुळे चर्चेत आहे. अलिकडेच कार्तिकने ‘लव्ह आज कल’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. “मी माझ्या पहिल्या प्रेयसीची ओखळ दूरची बहिण म्हणून लोकांकडे करायचो.” असा धक्कादायक खुलासा या शोमध्ये कार्तिकने केला.

कार्तिक तिला दूरची बहिण का म्हणायचा?

कार्तिक त्यावेळी १६ वर्षांचा होता. ती मुलगी आणि कार्तिक शाळेत एकाच बेंचवर बसायचे. शाळेतून दररोज दिल्या जाणाऱ्या गृहपाठाच्या निमित्ताने दोघांची मैत्री झाली. आणि पुढे मैत्रीचे रुपांतर पहिल्या प्रेमात झाले. परंतु हे प्रेम प्रकरण मित्रांना कळू नये यासाठी तो तिची ओळख दूरची बहिण असे सांगून करत असे. कारण जर त्या मुलीबद्दल मित्रांना कळले असते तर त्यांनी त्याला चिडवून हैराण केले असते. त्यामुळे मित्रांमार्फत उडवल्या जाणाऱ्या खिल्लीपासून वाचण्यासाठी त्याने ही नामी शक्कल लढवली होती.

‘लव्ह आज कल’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान प्रमुख भूमिका साकारणार आहेत. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या त्या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.